Shoking Viral Video In Train: ऑफिस किंवा घराबाहेर पडताना आपण अनेकदा ट्रेनने प्रवास करतो. यावेळी आपण दरवाजात उभे राहण्याच्या, हात बाहेर काढण्याच्या अनेक चूका करतो, ज्यामुळे अनेक अपघातही होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिलेला दरवाजात उभे राहण्याची चूक चांगलीच महागात पडली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू...
सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून अनेकदा आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी अंगावर काटाही उभा राहतो. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिलेची दरवाजात उभी राहण्याची चूक चांगलीच महागात पडल्याचे दिसत आहे.
व्हिडिओमधील महिला तिचा स्टॉप आल्यानंतर दरवाजात येवून उभी राहते. मात्र याचवेळी एक चोरटा ट्रेन चालू असतानाच दरवाजातून येवून महिलेच्या हातातील बॅग पळवण्याचा प्रयत्न करतो. महिला आणि चोराच्या झटापटीचा हा थरार व्हिडिओमध्ये दिसत आहे. (Latest Marathi News)
व्हिडिओमध्ये महिला एका पुरुषासोबत ट्रेनच्या दरवाजात उभी आहे. तिचे स्टेशन येणार असल्याने आपलं सर्व सामान वगैरे घेऊन स्टेशनवर उतरण्याच्या तयारीत हे लोक आहेत. काही वेळाने ट्रेनचा वेग कमी होतो आणि संधी साधत एक व्यक्ती ट्रेनच्या बाहेरून चालत्या ट्रेनमध्ये चढतो.
ही व्यक्ती थेट महिलेवर हल्ला चढवत महिलेच्या हातातील पर्स खेचण्याचा तो प्रयत्न करतो. महिला आपली पर्स वाचवण्याचा खूप प्रयत्न करते मात्र अखेर ती व्यक्ती पर्स खेचून चालत्या ट्रेनमधून बाहेर उडी मारते. ती महिला त्या चोराच्या मागे जाण्याचाही प्रयत्न करते.. पण तिच्या सोबत असलेला पुरूष तिला थांबवतो आणि पुढील अनर्थ टळतो.
हा व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना कधीही दरवाजात उभे न राहण्याचे आवाहन केले आहे. तर काही जणांनी स्टेशन आल्यानंतर उतरताना घाई न करण्याचाही सल्ला दिला आहे. दरम्यान, काल ओडिशाच्या बालासोरमध्ये (Odisa Train Accident) एक भीषण रेल्वे अपघात झाला आहे, ज्यामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. या दुर्देवी अपघातात तीन ट्रेनची धडक होऊन 288 जणांचा मृत्यू झाला. तर 1 हजारहून जास्त जण जखमी झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.