Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या धावत्या गाडीवर सिंहाची झडप; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Jungle Safari Video : सिंह असे विविध हिंस्त्र प्राणी पाहायला मिळतात. मात्र जंगल सफारीमध्ये रिस्क देखील फार मोठी आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका जंगल सफारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Ruchika Jadhav

Lion Hug Humans Video :

आजकाल अनेक व्यक्ती जंगल सफारी करतात. सध्या जंगल सफारी करणे ही एक क्रेझ झाली आहे. जंगली वन्य विभागाकडून एका व्हॅनमध्ये पर्यटकांना नेले जाते. त्यातून जंगल फिरत असताना वाघ, सिंह असे विविध हिंस्त्र प्राणी पाहायला मिळतात. मात्र जंगल सफारीमध्ये रिस्क देखील फार मोठी आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका जंगल सफारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जंगलात मोठ्या व्हॅनमधून काही व्यक्ती फिरण्यासाठी आले आहेत. जंगलात आले म्हटल्यावर प्रत्येकाला वाघ किंवा सिंह अथवा चीता असे हिंस्त्र प्राणी पाहण्याची इच्छा असते. येथे आलेल्या व्यक्ती देखील अशाच भावनेने आल्या होत्या. पर्यटक येथे आल्यावर त्यांना काही अंतरावर पोहचल्यानंतर एक सिंह झाडांच्या मागे असल्याचे दिसले.

सिंह दिसताच सर्वजण शांत झाले. यातील काही व्यक्तींनी सिंहाचा व्हिडिओ काढण्यासाठी फोन बाहेर काढले आणि व्हिडिओ ऑन केला. थोड्यावेळाने सिंहाला देखील ही व्हॅन आणि यातील व्यक्ती दिसल्या. माणसांना पाहताच सिंहाने या व्हॅनच्या दिशेने धाव घेतली. सिंह थेट येथील व्हॅनमध्ये शिरला. सर्वांच्या काळजाची धाकधूक वाढली होती. आता आपल्यापैकी एकाला जीव गमवावा लागणार असं सर्वांना वाटू लागलं.

मात्र प्रत्यक्षात काही वेगळंचं घडलं. सिंहाने धाव घेतल्यानंतर त्याने येथील सर्व व्यक्तींना मिठी मारली. जणू काही फार वर्षांपासून तो या व्यक्तींची वाट पाहत होता अशा पद्धतीने सिंहाने सर्वांना मिठी मारली आहे. हा चकित करणारा व्हिडिओ आफ्रिकेतील आहे. आफ्रिकेत जंगल सफरीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

@onlyanimals या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, प्राणी आणि माणसातील अतूट नातं. कदाचित जंगल सफारी करणारे हे सर्व प्राणी मित्र असावेत आणि ते नेहमी येथे येत असावेत. त्यामुळेच येथ हिंस्त्र प्राण्यांना देखील त्यांचा लळा लागला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट कमेंट केल्यात, लाखोंच्या घरात लाइक्स या व्हिडिओला आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol: आमदारांनी वेगळी भूमिका घेतली तीच राजकीय फूट; शिंदे गटाचा जोरदार युक्तीवाद, वाचा सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra News Live Update: आमदार राजेश पाडवी यांनी नाशिकमध्ये घेतली आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची भेट

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! जुनी पेन्शन योजना परत येणार; 'या' राज्य सरकारच्या निर्णयाने खळबळ

Jio Recharge: खुशखबर! फक्त 666 रुपयांमध्ये इतक्या दिवसांची वैधता, Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लान

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

SCROLL FOR NEXT