

सोलापूर शहर पोलीस दलात नवीन वर्षात मोठी फेरबदल होणार आहेत. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या येणाऱ्या वर्षात होण्याची शक्यता आहे. नुकतेच दोन सहायक पोलीस आयुक्त काही दिवसांपूर्वी सेवानिवृत्त झाले. एका सहायक आयुक्तांचा कार्यकाळ संपला असून, आणखी तिघे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. दुसरीकडे सोलापूर ग्रामीणमधील पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा आणि मुख्यालय येथील पोलीस उपअधीक्षकांचा कार्यकाळ पुढील तीन ते दहा महिन्यांत संपणार आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपीरही मे महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या पदांवर बदली होऊन येण्यासाठी अनेक अधिकारी इच्छुक आहेत. त्यामुळे बदल्यांकडे अनेकांचे लक्ष लागलंय. सोलापूर शहर पोलीस दलात पुढील वर्षी सहा सहायक पोलीस आयुक्त नव्याने येणार आहेत. यात वाहतूक, गुन्हे शाखा, नियंत्रण कक्ष, प्रशासन आणि विभाग एक यांचा समावेश आहे. नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांची वाहतूक, गुन्हे शाखा आणि विभाग एक येथे काम करण्यास अधिक पसंती असण्याची शक्यता आहे. ग्रामीण पोलिस दलातही अनेक अधिकारी इच्छुक असून, निवृत्त होणाऱ्या आणि कार्यकाळ संपलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांकडे त्यांचे लक्ष आहे.
दरम्यान सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा कार्यकाळ १५ ऑगस्ट २०२६ रोजी, तर शहराचे पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२६ मध्ये संपलाय. हिवाळी अधिवेशनापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे इच्छुक अधिकाऱ्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केलीय.
सोलापूर शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त प्रताप पोमण व सुरेंद्र मळाळे सेवानिवृत्त झाले आहेत. सहायक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांचा कार्यकाळ जुलै २०२६ मध्येच संपलाय. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मनोजकुमार यादव मार्च २०२७, दिलीप पवार मे २०२७, तर अरुण देवकर नोव्हेंबर २०२७ मध्ये निवृत्त होतील.सोलापूर ग्रामीणमधील मंगळवेढ्याचे डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपूजे यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२७ मध्ये पूर्ण होणार आहे.
आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. (करमाळा) आणि प्रशांत डगळे (पंढरपूर) यांचाही कार्यकाळ फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये पूर्ण होतोय. पोलीस उपअधीक्षक सीताराम डुबल मे २०२७ मध्ये सेवानिवृत्त होत आहेत, तर शिरीष हुंबे यांचाही दोन वर्षांचा कार्यकाळ काही महिन्यांत संपत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.