Mumbai Local Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Video: शिवीगाळ करणाऱ्याला लोकलमध्ये धडा! तरुणाने प्रवाशाला बेदम चोपला; VIDEO

Local Train Viral Video: सोशल मीडियावर सध्या मुंबई लोकलमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. लोकलमध्ये असे काही घडले ज्यामुळे तिथे जबरदस्त राडा झाला आहे. नक्की काय घडले ते एकदा व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Mumbai Local Train Incident: गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणं ही प्रत्येक मुंबईकरांसाठी रोजचीच बाब आहे. अनेकदा अशा वेळी जर कोणी प्रवाशांना त्रास देत असेल, शिवीगाळ करत असेल तर सहनशक्तीचा अंत होतो. अशाच एका घटनेने सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. लोकल ट्रेनमध्ये एका व्यक्तीने सतत शिवीगाळ आणि गैरवर्तन केल्यामुळे एका तरुण प्रवाशाने त्याला जोरदार चोप दिला. ही घटना सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

प्रवाशांचा संताप, मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लोकलमधून असंख्य प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत, अशातच लोकलच्या(Local) एक डब्ब्यात एक तरुण एका व्यक्तीला जोरदार मारताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे तरुणासोबत अजून एक व्यक्ती त्याला मारहाण करत आहे. सर्व प्रकार सुरु असताना सर्वत्र एकच गोंधळ उडाला, त्यामुळे काही प्रवाशांनी तरुणाला शांत करण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओत दिसत आहे.

लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हा मारहाणीचे कारण असे की, ज्या व्यक्तीला मारहाण झाली, त्याने लोकल ट्रेनमध्ये शिवीगाळ केली आणि गैरवर्तन केले होते. ही माहिती व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेली आहे. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्राम, ट्वीटर(एक्स), फेसबूक अशा प्रसिद्ध प्लॅटफॉर्मवर शेअर होत असून तो युट्युवरील King Garry's या पेजवर अपलोड करण्यात आलेला आहे.

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली,''एवढी मारहाण केली म्हणजे नक्की बायकोशी वाद घालून आला'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''अवघड आहे आता'' तिसऱ्या यूजरने कमेंट केली आहे की,''मुंबई लोकलमधून वारंवार धक्कादायक घटना समोर येत आहेत'' अशा प्रकारे प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: लोकल ट्रेनमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 12 जण जखमी; महामार्गावरील घटनेनं खळबळ|VIDEO

Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा कुटुंबातील सदस्याचे नवीन नाव? जाणून घ्या प्रोसेस

Wardha Accident : वर्ध्यात भीषण अपघाताचा थरार; बस आणि ट्रेलरची धडक, वाहनांचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT