
Shocking Traveling Video: मुंबईची 'लाईफलाईन' म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा अनेक वेळा विविध कारणांमुळे उशिराने धावत असते. त्याचा थेट परिणाम प्रवाशांवर होतो आणि स्टेशनांवर भयानक गर्दी निर्माण होते. परिणामी, अनेक प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यासाठीही जागा मिळत नाही आणि त्यांना दरवाज्यावर लटकून प्रवास करावा लागतो. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकलला झालेल्या विलंबामुळे काही महिला प्रवाशांना दरवाज्यावर लटकून अत्यंत धोकादायक पद्धतीने प्रवास क
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला लोकल ट्रेनमधून प्रवास करणारे असंख्य प्रवासी दिसत आहेत. त्यानंतर या व्हिडिओत लोकलमधील(Local Train) महिलांचा डब्बा गर्दीने तुडुंब भरलेला आहे. त्यात एका महिला प्रवाशाने लोकलच्या खिडकीतून एक व्हिडिओ बनवला आहे. ज्यात लोकलच्या दरवाजाला लटकून काही महिला धोकादायक प्रवास करत आहेत. अक्षरशा:कधीही या महिलांचा हात सुटेल आणि त्या धावत्या लोकलमधून कधीही पडतील असे वाटते.
व्हायरल होत असलेली ही घटना कल्याण रेल्वे मार्गावरील आहे आणि कल्याणहून आजची लेडीज स्पेशल ४० मिनिटे उशिराने पोहोचली, त्यामुळे प्रवाशांना हा गर्दीचा सामना करावा लागल आहे, असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल(Viral Video) झालेला आहे.पण साम टीव्ही याची पुष्टी करत नाही. व्हिडिओ आतापर्यंत सर्व माध्यमांवर व्हायरल होत आहे आणि यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
हा व्हिडिओ काहींनी फेसबूक तर काहींनी इन्स्टाग्रावर शेअर केला आहे आणि त्यात कमेंटबॉक्समध्ये अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यात एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये म्हटलं की,''कायमच असं असतं'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''पावसाळ्यात काय हाल होतील नागरिकांचे'' अशा संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत तर काहींनी महिलांचा धोकादायक प्रवास पाहून म्हटलं,''महिलांना कायम त्रासच सहन करावा लागला आहे''अशा संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या पाहू शकता
टीप: हा लोकलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.