
Ladies Compartment Clash: मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात लोकल ट्रेन ही लाखो लोकांची जीवनरेखा समजली जाते. रोजच्या प्रवासात या लोकल ट्रेनच्या महिला डब्यात विविध प्रसंग घडत असतात. बऱ्याचदा सुखद, तर काही वेळेस त्रासदायक तर काही वेळा थेट भांडणाच्या घटना टोकाला जाणाऱ्या असतात. नुकताच अशाच एका भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महिलांच्यात चांगलाच राडा झाल्याचे दिसून येत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये लोकल नुकतीच स्टेशनवर आलेली असते. त्यानंतर प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकलच्या(Mumbai Local) डब्ब्यातून उतरता काही महिला दिसत आहेत तर काही चढण्याचा प्रयत्न करत आहेत पण लोकल महिलांचा डब्बा पूर्णपणे महिलांच्या गर्दीने भरलेला असतो. काही महिलांना आतमध्ये जाण्यासाठी अडचण येत असते. धक्कादायक म्हणजे काही महिलांना बाहेर पडताच येत नव्हते. त्यावरुन थेट काही महिलांमध्ये वाद सुरु होतो.
सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. या सगळ्याचा एक प्रवाशाने मोबाईलवर व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड होताच काही क्षणांत व्हायरल झाला.सध्या हा व्हिडिओ(Women Video) प्रत्येक सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरल होत असून असंख्य लाईक्स आणि लाखोंचे व्ह्यूज याला मिळत आहेत
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील हे ठिकाण ठाणे स्टेशन असल्याचे समजत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एका यजूरने म्हटलं की,''नेहमीच झालं आहे हे'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''हीच आहे आपली मुंबई''अशा प्रकारे संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.