Kolhapur Hit And Run Accident Video:  Saamtv
व्हायरल न्यूज

Kolhapur Accident News: भीषण, तितकाच भयंकर अपघात! सुसाट कारची धडक, तरूण हवेत चेंडूसारखा उडाला, थरारक VIDEO

Kolhapur Hit And Run Accident Video: कोल्हापूरमध्ये एका भरधाव कारने पायी चाललेल्या तरुणाला उडवले. ही धडक इतकी भयंकर होती की तरुण थेट हवेत उंच उडाला. या धक्कादायक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, कोल्हापूर|ता. ३१ ऑगस्ट २०२४

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरू आहे. मुंबई, पुण्यामध्ये समोर आलेल्या हिट अँड रनच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. अशातच कोल्हापूरमधून एक भयंकर अपघाताची घटना समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये एका भरधाव कारने पायी चाललेल्या तरुणाला उडवले. ही धडक इतकी भयंकर होती की तरुण थेट हवेत उंच उडाला. या धक्कादायक अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोल्हापूरमध्ये हिट अँड रन!

कोल्हापूरमधून हिट अँड रनची एक भयंकर घटना समोर आली आहे. यामध्ये एका भरधाव कारने पायी चालत असलेल्या तरुणाला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण अन् भयंकर होती की तरुण चेंडूसारखा हवेत उंच उडाला. कोल्हापूरजवळील उंचगाव या गावात ही घटना घडली असून सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. गांधीनगर पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.

कारची धडक; तरुण हवेत उडाला..

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्रीच्या सुमारास एक तरुण रस्त्यावरुन घरी जात असल्याचे दिसत आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळही तशी कमीच आहे. तरुण पुढे जात असतानाच एक सुसाट वेगात आलेल्या कारने त्याला पाठीमागून जोराची धडक दिली. कारची धडक इतकी भयंकर होती की तो थेट हवेत उडला. या अपघातात तरुणाचे नेमके पुढे काय झालं? याबाबत माहिती समोर आली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, संपूर्ण रस्ता मोकळा असतानाही कारने तरुणाला उडवल्याने चालकाने मद्यप्राशन केल्याचाही संशय व्यक्त होत आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

मुंबई- गोवा महामार्गावरही अपघात..

मुंबई गोवा महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव रेल्वे स्टेशनजवळ भरधाव टेंपोने मोटार सायकलला धडक दिली. या अपघातात मोटर सायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. यज्ञेश उभारे असे मृत तरुणाचे नाव असून तो माणगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रभाकर उभारे यांचा मुलगा आहे. रात्री 11 वाजण्याण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT