Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीआधीच महायुतीत वादाच्या ठिणग्या; भाजप नेत्याचे अजित पवार गटावर गंभीर आरोप

Maharashtra Politics BJP Vs NCP: 'पैसे आमचे घेऊन काँग्रेसच्या पेंडलमध्ये तुमचे कार्यकर्ते नेते, नगरसेवक बसत होते. महायुतीचा धर्म एकट्याने आम्हीच पाळायचा का?" असा सवाल गणेश हाके यांनी उपस्थित केला.
Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीआधीच महायुतीत वादाच्या ठिणग्या; भाजप नेत्याचे अजित पवार गटावर गंभीर आरोप
Maharashtra Politics BJP Vs NCP: Saamtv
Published On

संदीप भोसले, लातूर|ता. ३१ ऑगस्ट २०२४

'राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमचे कधीही पटले नाही, आत्ता सोबत बसत असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात,' असे म्हणत शिंदेसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला. तानाजी सावंत यांच्या या विधानाने महायुतीमध्ये तणाव वाढत असतानाच आता भारतीय जनता पक्षाच्या आमदारानेही अजित पवार गटासोबतची युती म्हणजे असंगाशी संग असल्याचे म्हटले आहे. भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी हे विधान केले असून यावरुन आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीआधीच महायुतीत वादाच्या ठिणग्या; भाजप नेत्याचे अजित पवार गटावर गंभीर आरोप
Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! सलग ६ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याची निवडणुकीतून माघार

महायुतीमधील संघर्ष शिगेला!

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रत्येक मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढली आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, उपाध्यक्ष अशोक केद्रे, माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांच्या उपस्थितीत जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या यात्रेत भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्यावर लोकसभा निवडणुकीत युतीधर्म पाळला नसून काँग्रेसचे काम केल्याचा गंभीर आरोप केला.

भाजप नेत्याचा राष्ट्रवादीवर निशाणा!

"सध्या अहमदनगरमध्ये अजित पवार गटाचेच आमदार आहेत. ते म्हणतात आपली युती आहे. आपली युती होती तर तुम्ही लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळला का? आमच्या खासदारासाठी तुम्ही काम केलं का ? उलट तुम्ही आमच्या खासदारांना पाडण्याचं काम केले," असे आरोप यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी केला आहे. "पैसे आमचे घेऊन काँग्रेसच्या पेंडलमध्ये तुमचे कार्यकर्ते नेते, नगरसेवक बसत होते. महायुतीचा धर्म एकट्याने आम्हीच पाळायचा का?" असा सवाल गणेश हाके यांनी उपस्थित केला.

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीआधीच महायुतीत वादाच्या ठिणग्या; भाजप नेत्याचे अजित पवार गटावर गंभीर आरोप
Kalyan Crime : महाराष्ट्र पुन्हा हादरला! अवघ्या 2 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, कुठे घडला हा संतापजनक प्रकार?

'दुर्दैवाने राष्ट्रवादीशी युती...'

"दुर्दैवाने आमच्यासोबत अजित पवार गटाची युती आहे. खरं म्हणजे त्यांची युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंगाशी संग म्हणतात असं आता राहिलं आहे." असेही गणेश हाके यावेळी म्हणाले. एकीकडे तानाजी सावंत यांच्या विधानाने राष्ट्रवादीचे नेते संतापले असून मुख्यमंत्र्यांकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. अशातच आता भाजप नेत्यानेही राष्ट्रवादीच्या युतीवर नाराजी व्यक्त केल्याने नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीआधीच महायुतीत वादाच्या ठिणग्या; भाजप नेत्याचे अजित पवार गटावर गंभीर आरोप
Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मविआचे महायुतीला धक्के? दर आठवड्याला 2 पक्षप्रवेश ? 12 बड्या नेत्यांना वाटते भारी, पवारांची तुतारी?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com