Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप? अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार? वाचा...

Ajit Pawar: आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी केलेल्या विधानामुळे शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला तीव्र वाद चव्हाट्यावर आलाय. त्यामुळे अस्वस्थ असलेले अजित पवार विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुतीतून बाहेर पडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झालीय.
विधानसभेपूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप? अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार? वाचा...
CM Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra FadnavisSaam Tv
Published On

महायुती सरकारमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून दसऱ्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू असते. मात्र ही धुसफूस आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या विधानामुळे चव्हाट्यावर आलीय. आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडीला मांडी लावून बसलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात असं धक्कादायक विधान सावंतांनी जाहीर कार्यक्रमात केलंय. हे कमी होतं की काय, त्यानंतर काही वेळातच सावंतांची दुसरी व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली.

यात त्यांनी धाराशिवच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी मतदान मागितलं नसल्याचं कबूल केलं. 'मांडीला मांडी लावून बसतो, बाहेर उलट्या करतो', असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं.

विधानसभेपूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप? अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार? वाचा...
Rajkot Fort : राजकोटवर उभारणार शिवरायांचा भव्य पुतळा, दुर्घटनेचीही होणार चौकशी; 2 समित्यांमध्ये कोण-कोण?

सावंतांच्या या विधानांमुळे अजित पवार आणि सुनील तटकरेंनी थेट मुख्यमंत्री शिंदेंकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. अजितदादांच्या पक्षानं तर सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केलीय. शिंदे गटानं मात्र सारवासारव करत सावंतांच्या विधानापासून फारकत घेतलीय. यातच अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेष पाटील यांनी म्हटले आहे की, 'सावंतांची हकालपट्टी करा नाहीतर आम्ही बाहेर पडतो.' तर यावरच शिंदे गटानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या वादावर बोलताना उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, 'सावंतांचं मत व्यक्तिगत, पक्षाची भूमिका नाही'

अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर शिंदे गटातल्या अनेक नेत्यांनी सत्तेच्या सारीपाटात तिसरा भिडू नको अशी भूमिका वारंवार घेतली होती. मात्र लोकसभा निवडणुकीतल्या यशामुळे शिंदे गटाचा आत्मविश्वास वाढला. तर अजित पवारांच्या पक्षाची चांगलीच गोची झाली. त्यामुळे अजित पवारच नाराज असल्याची चर्चा रंगू लागली. आणि त्यांनी ती वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या मार्गानं व्यक्तही केली.

विधानसभेपूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप? अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार? वाचा...
Mira Bhayandar News: शिवसेना गल्लीत भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा...

दरम्यान, राज्यभर सुरू असलेल्या जन्मसन्मान रॅलीच्या बॅनरवरून लाडकी बहीण योजनेच्या नावातून मुख्यमंत्री उल्लेख हटवला. ९ हजार कोटींच्या अॅम्बूलन्स कंत्राटावरून शिंदे आणि अजित पवारांमध्ये खडाजंगी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. बदलापूर अत्याचाराविरोधातलं आंदोलन राजकीय असल्याचा आरोप शिंदेंनी केला. मात्र अजित पवारांनी थेट गुप्तांग कापण्याची भाषा केली. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा वा-यामुळे कोसळ्याचा शिंदेंनी दावा केला मात्र अजित पवारांनी थेट जनतेची माफी मागितली.

दोन लहान भावांना एकत्र आणून भाजपनं सत्ता स्थापन केली खरी. मात्र या लहान भावांमधलं भांडण काही केलं तरी थांबायला तयार नाही. महायुतीतले तीन पक्ष एकत्र आल्य़ानंतर मोठा फायदा होण्याची अपेक्षा होती. मात्र सर्वाधिक नुकसान अजित पवार गटाचं झालंय. त्यामुळे अजित पवार कमालीचे अस्वस्थ आहेत. लोकसभेसारखी स्थिती विधानसभेत होऊ नये असा दादांचा प्रयत्न आहे. त्यामुळे अजित पवार महायुतीत बाहेर पडणार का की भाजप आणि शिंदेंसोबत पुन्हा जुळवून घेणार याबाबत उत्सुकता वाढलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com