Rajkot Fort : राजकोटवर उभारणार शिवरायांचा भव्य पुतळा, दुर्घटनेचीही होणार चौकशी; 2 समित्यांमध्ये कोण-कोण?

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने समिती गठीत करण्यात आली आहे.
राजकोटवर उभारण्यात येणार शिवरायांचा भव्य पुतळा, दुर्घटनेचीही होणार चौकशी; दोन समित्या स्थापन, वाचा कोण
CM Eknath Shinde Saam Tv
Published On

सचिन गाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

एक मोठी बातमी समोर आली आहे. किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नव्याने उभारण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच दुर्घटनेची चौकशी करण्यासाठीही समिती गठीत करण्यात आली आहे.

शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी समिती गठीत

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेत समितीचं गठन करण्यात आलं आहे. इतिहासकार जयसिंगराव पवार हे समितीत विशेष निमंत्रित सदस्य असतील.

राजकोटवर उभारण्यात येणार शिवरायांचा भव्य पुतळा, दुर्घटनेचीही होणार चौकशी; दोन समित्या स्थापन, वाचा कोण
CM Eknath Shinde Video : शिवसैनिकांनी अडवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा, पाहा व्हिडिओ

सोबतच आयआयटी मुंबईतील तज्ज्ञ प्राध्यापक अभियंत्यांची समितीत समावेश आहे. नव्याने उभारण्याच्या कामाची संकल्पना आणि कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्य शासनाकडून समिती गठीत करण्यात आली असल्याचं सांगण्यात येतं आहे.

दुर्घटनेची होणार चौकशी, समितीत कोण-कोण?

दरम्यान, राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. या दुर्घटनेच्या संदर्भात चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. भारतीय नौदलाचे तज्ज्ञ कमोडर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

राजकोटवर उभारण्यात येणार शिवरायांचा भव्य पुतळा, दुर्घटनेचीही होणार चौकशी; दोन समित्या स्थापन, वाचा कोण
Mira Bhayandar News: शिवसेना गल्लीत भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा...

पुतळा दुर्घटना घडली यासंदर्भात नक्की कारणं काय आहे? याची ही समिती चौकशी करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही समिती गठीत करण्यात अली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांचा देखील या समितीमध्ये समावेश आहे. तसेच आयआयटी मुंबईतील तज्ज्ञांचा समावेश देखील या समितीत करण्यात आला आहे. गठीत करण्यांत आलेली समिती खालील बाबींवर विचार करुन तद्‌नुषंगाने यथोचित शिफारशी शासनास सादर करेल.

अ) किल्ले राजकोट, जि. सिंधुदूर्ग येथे भारतीय नौदलामार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत झालेल्या दुर्घटनेची नेमकी करणे शोधणे.

ब) सदर दुर्घटनेमागील दोषी निश्चित करणे.

क) वरील तांत्रिक समितीने नेमून दिलेले काम हाती घेऊन, आवश्यक अहवाल राज्य शासनास तात्काळ सादर करणे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com