महाराष्ट्र पुन्हा हादरला! अवघ्या 2 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, कुठे घडला हा संतापजनक प्रकार?
Kalyan Crime NewsSaam TV

Kalyan Crime : महाराष्ट्र पुन्हा हादरला! अवघ्या 2 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, कुठे घडला हा संतापजनक प्रकार?

Kalyan Crime News : अंगणात खेळत असलेल्या एका 2 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही संतापजनक घटना कल्याणजवळील टिटवाळा दहागाव परिसरात घडली.
Published on

अभिजित देशमुख, साम टीव्ही कल्याण

महाराष्ट्रात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. या घटनेच्या जखमा नागरिकांच्या मनात ताज्या असतानाच आता कल्याणमध्येही अशाच प्रकारची संतापजनक घटना घडली.

महाराष्ट्र पुन्हा हादरला! अवघ्या 2 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, कुठे घडला हा संतापजनक प्रकार?
Pimpri Chinchwad : आईच्या प्रियकराकडून 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; पिंपरी चिंचवडमधील संतापजनक घटना

अंगणात खेळत असलेल्या एका 2 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही संतापजनक घटना कल्याणजवळील (Kalyan News) टिटवाळा दहागाव परिसरात घडली. मुलगी रडत घरी गेल्यानंतर आई-वडिलांनी तिची विचारपूस केली, असता हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी (Police) तत्काळ कारवाई करत नराधमाला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली शुक्रवारी दुपारच्या सुमारास घराबाहेर खेळत होती.

त्याचवेळी परिसरातील एक नराधम आला. याने निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर त्याने चिमुकलीला सोडून दिले. वेदना असह्य झाल्यानंतर चिमुकली रडत रडत घरी आली. आई-वडिलांनी तिला याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला. पण लहान असल्याने ती काहीच सांगू शकली नाही.

चिमुकलीच्या अंगावर कुठे दुखापत झाली तर नसावी, असा संशय कुटुंबियांना आला. त्यांनी तिची पाहणी केली असता घडलेला प्रकार लक्षात आला. आई-वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेत यासंदर्भातील तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल केला. तसेच तपासाची चक्रे फिरवत आरोपीला काही तासातच अटक केली.

महाराष्ट्र पुन्हा हादरला! अवघ्या 2 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, कुठे घडला हा संतापजनक प्रकार?
Crime News : नात्याला काळिमा! आधी बापाने, मग मामानेही केला अत्याचार, १० वर्षांच्या मुलीसोबत भयंकर कृत्य!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com