Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : लॉटरीच लागली! मच्छिमारांना पुराच्या पाण्यात सापडले ३० किलो वजनाचे दोन मोठे मासे, पाहा VIDEO

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रंजीत माझगावकर, साम टीव्ही

येत्या काही दिवसात श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. तुम्हाला माहितीच आहे श्रावण महिना सुरु होण्याआधी अनेक मासे प्रेमी विविध मासे खाण्याचा आनंद लुटून घेतात शिवाय मासे खाण्यासाठी प्रसिद्ध अशा हॉटेलमध्ये जात असतात. याच मासेप्रेमींसाठी एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात पुराच्या पाण्यात तब्बल ३० किलो वजनाचे मासे सापडले आहेत.

सध्या महाराष्ट्रासह सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी पावसाने हाहाकार केला आहे तर काही ठिकाणी महापुरही आला आहे. सोशल मीडिया याच पावसाळ्यातील विविध घटनांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कधी पुरात(Rain) अडकलेल्या लोकांना वाचवताना व्यक्ती आहेत तर पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या महागड्या कार आहेत. मात्र सध्या पुराच्या पाण्यात सापडलेल्या महाकाय माश्यांबद्दल सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय शिवाय याचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) कोल्ह्यापुर जिल्ह्यातील आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील इंगळी गावातील मासेमारांना महापुरात तब्बल 30 किलो वजनाचे दोन मासे सापडले आहेत. शुभम रेंदाळे, फरदिन नायकवडी, बबलू जमादार, सोयल नायकवडी, जुबेर नायकवडी, उदय हांडे, इर्शाद नायकवडी यांनी इंगळीतील जुना चंदुर रस्त्यावर आलेल्या पुराच्या पाण्यात आज सकाळी पंचगंगा नदीवर मासे पकडण्यासाठी गेले असता मच्छीमारांनी लावलेल्या जाळ्यात हे मासे गळाला लागली आहेत. एवढे मोठे मासे गळाला लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी मासे पाहण्यासाठी गर्दी केली होती.

सध्याची परिस्थिती

कोल्हापूर पन्हाळा मार्गावरच केर्ली या ठिकाणी आलेले पुराचे पाणी आता कमी होऊ लागल्याने वाहनधारकांची ये-जा सुरू झाली आहे. प्रशासनाने मात्र अधिकृतरित्या हा रस्ता(Road) अद्यापही खुला केलेला नाही. वाहनधारक मात्र पर्यायी मार्गाचा वापर न करता कसरत करत पाण्यातून वाट काढत पुढे जात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT