महिला आणि तरुणी म्हटलं की, मेकअप आलाच. प्रत्येक मुलीला मेकअप करून सुंदर दिसावं असं वाटतं. मेकअप म्हणजे मुलींसाठी जीव की प्राण त्यासाठी त्या काही करू शकतात. या वाक्याची प्रचिती घडवून देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट दुखेपर्यंत नक्की हसाल.
लोकल ट्रेन आणि त्यातील महिलांचा डब्बा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. येथे कधी तरुणी आणि महिलांची हाणामारी पाहायला मिळते तर कधी विविध वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांची गर्दी पाहायला मिळते. महिलांच्या ट्रेनमधील डब्ब्यात रुमाल, क्लिप, कानातले, कपडे, भाज्या, फळे असे विविध विक्रेते दिसतात. त्यात तुम्ही कधी ट्रेनमध्ये पार्लर सुरू असल्याचं पाहिलं आहे का? हो काही महिलांनी लोकल ट्रेनमध्ये थेट पार्लर आणि मेकअप सुरू केलं आहे.
आता तुमच्यापैकी अनेक मुली पार्लरमध्ये आयब्रो तर करतच असतील. आयब्रो करणे फार सोपे नाही. आयब्रोमध्ये काही चूक झाली की संपूर्ण चेहऱ्याचा लूक बिघडतो. मात्र धावत्या लोकल ट्रेनमध्ये या महिलांनी थेट आयब्रो केले आहेत. थ्रेडच्या मदतीने आयब्रो करण्यासाठी एक महिला गर्दीत दरवाजाजवळ उभी आहे. महिलांची ही करामत आणि मेकअपवर असलेलं प्रेम दुसऱ्या एका महिलेने आपल्या फोनमध्ये कैद केलं आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेनमध्ये फार गर्दी आहे. या गर्दीत उभे राहण्यासाठी देखील पुरेशी जागा नाही. मात्र तरीही ही महिला दरवाजाला असलेल्या खांबाचा आधार घेऊन उभी आहे. तर तिथेच खाली एक महिला बसली आहे आणि आयब्रो करण्याचे काम सुरू आहे. धावती ट्रेन फार जास्त वेगात असते. त्यामुळे त्यात हात सोडून उभे राहिल्यास तोल जाण्याची भीती असते.
मात्र या महिलेने दरवाजाजवळ सुद्धा स्वतःला नीट बॅलन्स केलं आहे आणि ती प्रवास करत आहे. सोशल मीडियावर @sheliganguly या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या या व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर अनेक भन्नाट कमेंट्स सुद्धा केल्यात. वो महिला है वो कूछभी कर सकती है, असं एकाने लिहिलं आहे. तर आणखी काही व्यक्तींनी या महिलांची काळजी व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.