kerala police google
व्हायरल न्यूज

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवला धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

केरळमधील एका कार चालकाला रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले. त्याच्यावर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

Dhanshri Shintre

केरळ पोलिसांनी रुग्णवाहिकेचा मार्ग अडवणाऱ्या कारवर कडक कारवाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्रिशूर जिल्ह्यातील एका कार ड्रायव्हरचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात आला असून त्याला अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्ह्यातील चालकुडी शहरात ही घटना 7 नोव्हेंबर रोजी घडली आणि कार चालकाने कथितरित्या त्रिशूर मेडिकल कॉलेजकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेला रस्ता दिला नाही. ही रुग्णवाहिका पोन्नानीहून येत होती.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की अरुंद दुपदरी रस्त्यावर रुग्णवाहिका दोन मिनिटांपेक्षा जास्त काळ कारचा पाठलाग करत होती, परंतु कार चालकाने तिला ओव्हरटेक करण्याचा मार्ग दिला नाही. यादरम्यान रुग्णवाहिका चालक वारंवार हॉर्न वाजवून आणि सायरन वाजवत असतानाही कार चालक आपत्कालीन वाहनाला जाण्यापासून रोखताना दिसत आहे. व्हिडीओच्या स्वरुपात ठोस पुरावे समोर आल्यानंतर केरळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कार चालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केला आणि त्याला मोठा दंड ठोठावला.

केरळ पोलिसांच्या या कारवाईचे सोशल मीडियावर खूप कौतुक झाले. अनेक वापरकर्त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून पोलिसांच्या जलद कारवाईचे कौतुक केले आणि कार चालकाच्या कृतीचा निषेध केला.

एका यूजरने X वर व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले, हे वेडेपणा आणि अमानवी कृत्य आहे. केरळमधील एका कार मालकाला अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्याने त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे. केरळ पोलिसांनी खूप चांगले काम केले आहे.

आणखी एका युजरने लिहिले की, हा असाच बेजबाबदार ड्रायव्हिंग आहे ज्यामुळे इतरांचा जीव धोक्यात येतो. आदर्श घालून दिल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन.

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT