टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क 2024 मधील व्यवसायातील 100 सर्वात शक्तिशाली लोकांच्या फॉर्च्युनच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. या यादीत मस्कनंतर एनव्हीडियाचे सीईओ जेन्सेन हुआंग दुसऱ्या स्थानावर आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला तिसऱ्या स्थानावर आहेत. दोन्ही कंपन्यांनी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. अमेरिकेचे ग्लोबल बिझनेस मॅगझिन फॉर्च्युन दरवर्षी ही क्रमवारी प्रसिद्ध करते. यामध्ये आपल्या उद्योगात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप-100 व्यावसायिकांची नावे समाविष्ट आहेत.
वित्त आणि ग्राहक तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या वॉरेन बफे, जेमी डिमन आणि ॲपलचे टिम कुक यांचीही नावे या यादीत समाविष्ट आहेत. मेटा चे मार्क झुकेरबर्ग आणि ओपनएआय चे सॅम ऑल्टमन यांचाही या यादीतील टॉप-10 मध्ये समावेश आहे.
तर भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी या यादीत 12 व्या क्रमांकावर आहेत. रिलायन्सने दूरसंचार आणि ऊर्जा क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. रँकिंगमध्ये गुगलचे सुंदर पिचाई 10व्या तर ॲमेझॉनचे जेफ बेझोस 11व्या स्थानावर आहेत. टेकमधील उत्तम कामगिरीसाठी दोघांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.
जाणून घ्या टॉप १२ बिजनेसमॅन आणि कंपनी
1. एलॉन मस्क - टेस्ला आणि स्पेस एक्स
2. जेन्सन हुआंग - एनव्हिडिया
3. सत्य नडेला - मायक्रोसोफ्ट
4. वॉरेन बफेट - बर्कशायर हॅथवे
5. जेमी डिमन - जेपी मॉर्गन चेस
6. टिम कूक - अॅपल
7. मार्क झुकेरबर्ग - मेटा
8. सॅम ऑल्टमन - ओपनएआय
9. मेरी बारा - जनरल मोटर्स
10. सुंदर पिचाई - अल्फाबेट
11. जेफ बेजोस - अॅमेझॉन
12. मुकेश अंबानी - रिलायंस इंडिस्ट्रीज
Written By: Dhanshri Shintre.