Pre Wedding-Photoshoot In Operation Theatre Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: अरे देवा, कहरचं! चक्क ऑपरेशन थिएटरमध्ये प्री वेडिंग फोटोशूट; VIDEO समोर आला अन्...

Pre Wedding-Photoshoot In Operation Theatre: आत्तापर्यंत हिल स्टेशन, मंदिरे, समुद्रकिनारी केलेले वेडिंग फोटोशूट तुम्ही अनेकदा पाहिले असतील. मात्र कर्नाटकच्या एका कपलने चक्क सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएयरमध्येच प्री वेडिंग फोटोशूट केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Gangappa Pujari

Pre Wedding Photoshoot In OT:

लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या प्री वेडिंगसाठी अनेकजण भन्नाट स्टाईल, हटके लोकेशन्स शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आत्तापर्यंत हिल स्टेशन, मंदिरे, समुद्रकिनारी केलेले वेडिंग फोटोशूट तुम्ही अनेकदा पाहिले असतील. मात्र कर्नाटकच्या एका कपलने चक्क सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएयरमध्येच प्री वेडिंग फोटोशूट केल्याचा प्रकार समोर आला आहे.

काय आहे प्रकरण?

कर्नाटकातील (Karanataka) चित्रदुर्ग जिल्ह्यातील एका भावी डॉक्टर दांपत्याला लग्नापुर्वीचे पी वेडिंग फोटोशूट चांगलेच महागात पडले आहे. भरमसागर सरकारी रुग्णालयातील एका भावी डॉक्टर कपलने ऑपरेशन थिएटरमध्येच प्री वेडिंग करण्याचा प्रताप केला. या धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संबंधित डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे.

भावी डॉक्टर दांपत्याचं रुग्णालयात फोटोशूट..

अभिषेक असे या निलंबित डॉक्टरचे नाव आहे. या प्री वेडिंग शूटमध्ये डॉक्टर अभिषेक हे पेशंटचे ऑपरेशन करत आहेत तर त्यांची होणारी पत्नी ही त्यांना मदत करत असल्याचे दाखवण्यात आले होते. या धक्कादायक प्रकाराचे व्हिडिओ, फोटो समोर आल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओ व्हायरल...

व्हिडिओमध्ये (Viral Video) डॉक्टर रुग्णावर शस्त्रक्रिया करताना दिसत आहेत, तर त्यांची साथीदार मदत करत आहे. व्हिडिओच्या शेवटी, ज्या व्यक्तीवर रुग्ण म्हणून शस्त्रक्रिया करण्यात आली होती तो ऑपरेशननंतर बसलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये कॅमेरे आणि लाईटसोबतच ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग शूटसाठी अनेक लोक उपस्थित असल्याचेही दिसत आहे.

आरोग्यमंत्र्यांची कारवाई..

या संपूर्ण प्रकरणाची कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी गंभीर दखल घेतली आहे. "शासकीय रुग्णालयांमध्ये असे गैरप्रकार घडू नयेत, यासाठी संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांना काळजी घ्यावी सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकार अशा वैद्यकीय सुविधा पुरवते, हे सर्वांनी लक्षात ठेवावे, असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

SCROLL FOR NEXT