Pakistan Elections Explainer: तुरुंगात कैद असलेल्या इम्रान खानला का मिळाली पसंती? युवकांमध्ये का आहे क्रेझ

Pakistan Elections : पाकिस्तानमधील निवडणुकांच्या निकालांनी सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे. इम्रान खानचा पक्ष पीटीआयच्या उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. यासोबतच दोन तृतीयांश बहुमताचा दावा करत पीटीआयचे संस्थापक इमरान खान यांनी तुरुंगातून देशातील जनतेला संदेश दिला.
Pakistan Elections
Pakistan Elections Saam Tv
Published On

Pakistan Elections Explainer:

पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी संसदीय निवडणूक आणि आणि प्रांतिक निवडणुका झाल्या. या मतदानाची मत मोजणी अजून होत आहे, दरम्यान आतापर्यंत आलेल्या निकालानुसार इम्रान खान यांच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. विशेष भ्रष्टाचार आणि इतर प्रकरणात तुरुंगात असेलल्या इम्रान खान यांना सर्वाधिक पसंती का मिळाली या प्रश्ना सर्वजण आवाक झाले आहेत. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार 'किंगमेकर'च्या भूमिकेत दिसत आहे.(Latest News)

पाकिस्तानच्या (Pakistan) नॅशनल असेंब्लीमध्ये ३३६ सदस्य असतात. यातील २५६ जागांवर निवडणुका झाल्या. सरकार (Government) बनवण्यासाठी १३४ जागा जिंकणं आवश्यक आहे. 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या तरुण मतदारांची (Voters) मते इम्रान खान यांच्या पक्षाकडे जात असल्याचे दिसत आहे. तरुण मतदार तुरुंगात असलेल्या इम्रान खान (Imran khan) यांच्या पक्षाला का मतदान करत आहेत, हा प्रश्न पडलाय.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शुक्रवारी जनादेश मिळाल्याची घोषणा केली. ते म्हणाले, "पीएमएल-एन सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. आम्ही आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी इतर गटांशी चर्चा करू." असं ते म्हणाले. दरम्यान निवडणुकांचे निकाल अद्याप पूर्णपणे लागलेले नाहीत. अजून मतमोजणी केली जात आहे. पण तिन्ही पक्षांकडून सत्ता स्थापनेचा दावा केल्या जात आहे.

इमरान खानला सत्तेतून बाहेर काढले

इम्रान खान यांना २०२२ मध्ये सत्तेतून बाहेर काढण्यात आला होता. त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप आहेत. मागील वर्षाच्या ऑगस्टमध्ये इम्रान खान यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर इमरान खान याच्यावर निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आलं. निवडणूक विश्लेषकांच्या मते, पीटीआयची मजबूत कामगिरी संभाव्य विरोधी घटक आणि इम्रान खान यांच्या समर्थनाची लवचिकता दर्शवते. इतर पक्षांना भीती आहे की, जर अपक्ष स्वबळावर सरकार बनवू शकत नसतील तर त्यांच्या मोठ्या संख्येने पाकिस्तानला बनवू शकते. निवडणुकीच्या प्रचार चालू असताना मोबाईल इंटरनेट बंद करण्यात आल्याचा आरोप पीटीआयच्या कार्यकर्त्यांनी केला.

विल्सन सेंटरमधील दक्षिण आशिया इंस्टीट्यूटचे संचालक मायकेल कुगेलमॅन म्हणाले, पीटीआयला निश्चितच पाकिस्तानच्या राजकारणात निष्क्रिय केलंय. यामुळे अनेक जागांवर याचा परिणाम झालाय,परंतु त्यांना मिळणारा समर्थनात वाढ झालीय. मायकेल कुगेलमॅन म्हणाले, "पीटीआयला समर्थन देणाऱ्यांमध्ये तरुण मतदार अधिक आहेत. जे शक्तिशाली लष्करी सेनापतींशी मतभेद असूनही सैन्य-समर्थित लष्करी कारवाईशी झुंज देत.

तर काही जाणकार म्हणाले की, राजकारणातील लष्काराच्या भागीदारीमुळे इम्रान खान यांच्या समर्थकात वाढ केली. पाकिस्तानातील वाढती महागाई आणि इम्रान खान यांना तुरुंगात पाठवण्यात आल्याने तरुणांमध्ये नाराजी आहे. त्याचा परिणाम निकालात दिसत आहे. पीटीआयाला मिळालेल्या या समर्थनामुळे पाकिस्तानी लष्कर चिंतेत असल्याचं ऑक्सफोर्ड विद्यापीठातील ब्लावाटनिक स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमधील सहाय्यक प्राध्यपक माया ट्यूडर म्हणाले.

इमरान खान प्रसिद्ध क्रिकेटर आणि सोशल मीडियातही लोकप्रिय आहेत. त्याचा फायदा त्यांच्या पक्षाला झाला. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'चा अंदाज आहे की २०१८ च्या निवडणुकीपासून १० दशलक्ष तरुण मतदार पाकिस्तानमध्ये सामील झाले आहेत.

Pakistan Elections
Pakistan News: पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांना १० वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com