Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: जंगल सफारीला आलं कुटुंब; अचानक कारवर चढले 3 चित्ते, पुढे जे घडलं ते भयंकरच

Jungle Safari Viral Video: अनेक हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीत प्रवेश करू लागलेत. हे काही कमी होते ते अनेकांनी आता जंगल सागरी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र जंगल सफारी कधी जीवघेणी देखील ठरू शकते.

Ruchika Jadhav

Jungle Safari Leopard Attack:

अनेक व्यक्ती प्राणी प्रेमी असतात. त्यामुळे बरेच जण पाळीव प्राणी आपल्या घरामध्ये पाळतात. मात्र सध्या हिंस्त्र प्रण्यांसोबत फोटोशूट करण्याचा ट्रेण्ड सुरू आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती निसर्गाच्या सानिध्यात जंगल सफारी करण्याचा निर्णय घेतात.

माणसाने आधीच आपल्या फायद्यासाठी जंगल तोड केली आणि तेथे घरे बांधली. त्यामुळे प्राण्यांचा निवारा कमी झाला. अशात अनेक हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीत प्रवेश करू लागलेत. हे काही कमी होते ते अनेकांनी आता जंगल सफारी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र जंगल सफारी कधी जीवघेणी देखील ठरू शकते. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुटुंब जंगल सफारीसाठी आलं होतं. जीपमधून सर्वजण जंगलाच्या दिशेने निघाले. जंगलात गेल्यावर तेथील निसर्गरम्य वातावरण सर्वांना फार आवडलं. मात्र काही वेळातच त्यांच्या डोळ्यासमोर मृत्यूने ठाण मांडलं. जंगलाच्या मध्यभागी पोहचल्यावर त्यांनी जीप थांबवली आणि आजूबाजूला पाहू लागले. तितक्यात एक चित्ता त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. काहीवेळाने चित्ता त्यांच्या जीपवर चढला.

सर्वजण प्रचंड घाबरले होते. मात्र गार्डनने त्यांना जीपमध्येच स्तब्ध बसून राहा असे सांगितले. तितक्यात जीप समोर आणखी 2 चित्ते आले. त्यातील एक चित्ता तर थेट जीपमध्ये येऊन बसला.

या संपूर्ण थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. पुढे नेमकं काय घडलं हे समजू शकलेलं नाही. मात्र आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. @apnomerta या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लाईक मिळालेत. नेटकऱ्यांनी देखील यावर कमेंट्स केल्यात. काहींनी जंगल सफारी करणे चुकीचं असल्याचं देखील कमेंटमध्ये लिहिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

SCROLL FOR NEXT