Minor accident fight saam tv
व्हायरल न्यूज

Minor accident fight: दुचाकीला धडक दिल्याने महिलेची सटकली, दगडाच्या सहाय्याने तरुणाची बुलेट अक्षरश: फोडली; VIDEO व्हायरल

Minor accident turns violent: जयपूरमध्ये छोट्याशा अपघातानंतर एका तरुणीने संतापाच्या भरात बाईकची तोडफोड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर चालकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

किरकोळ वादातून घडणाऱ्या मोठ्या घटना अनेकदा सोशलम मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. जयपूरमध्ये एक छोट्याशा अपघातानंतर घडलेला प्रकार सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होचोय. एका तरुणीने संतापाच्या भरात भर रस्त्यात केलेल्या तोडफोडीमुळे मोठा गोंधळ उडाला.

कुठे घडली ही घटना?

राजस्थानची राजधानी जयपूरमधील बाइस गोदाम या पॉश भागात ही घटना घडली. एक तरुणी स्कूटीवरून जात असताना मागून येणाऱ्या बुलेटवरील तरूणाने तिच्या स्कूटीला हलकीशी धडक दिली. या धडकेत स्कूटीचं फारसं नुकसान देखील झालं नाही. मुळात चूक लक्षात आल्यानंतर बुलेट चालक तिथून निघून न जाता थांबला आणि तरुणीची विचारपूस करत मदत करण्याचा प्रयत्न करत होता.

मात्र, यानंतर परिस्थिती अचानक बिघडली. मदत करणाऱ्या त्या तरूणावर मुलीचा राग अनावर झाला. संतापून तिने रस्त्याच्या कडेला पडलेला हेल्मेट उचलून बुलेटवर जोरात मारला. तिने हेल्मेट इतरा जोरात मारला ती बाईकचे दोन्ही आरसे फुटले. तरीही तिचा राग शांत झाला नाही आणि तिने रस्त्यावरचे दगड उचलून बुलेटवर मारण्यास सुरुवात केली.

इतकंच नाही तर ती सतत शिवीगाळ करत होती आणि चालकाला धमक्या देत होती. महत्त्वाचं म्हणजे हा प्रकार सुरु असताना बुलेट चालक मात्र शांतपणे हे सगळं पाहत उभा होता.

या सगळ्या प्रकारामुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींनी आणि स्वतः बुलेट चालवणाऱ्याने या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तरुणीच्या वर्तनावर अनेकांनी नाराजी व्यक्त केलीये.

पोलिसात केली तक्रार

दरम्यान, बुलेट चालकाने या घटनेचे व्हिडिओ पुरावे घेऊन स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणात अजून पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाल्याची माहिती समोर आलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा अनुभवी चेहरा हरपला; PM मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: नंदूरबारमध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या 'मिलेट चॉकलेट'मध्ये किडे आणि अळ्या

Second hand car: सेकंड हँड गाडी घेताय? या गोष्टी नीट तपासून पाहाच

Teacher Transfers: शिक्षकांना मूळ गावी बदली नाहीच; बदलला बदलीचा नियम, सरकारचा मोठा निर्णय

Weight Loss: ना जिम ना कठोर डाएट; पैसे खर्च न करता करा वजन कमी, जाणून घ्या हा फायदेशीर उपाय

SCROLL FOR NEXT