Israel–Hamas War Saam TV
व्हायरल न्यूज

Israel–Hamas War: 'मी सर्वांना वाचवू शकलो नाही...' म्हणत अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर ढसाढसा रडला; इस्त्रायलमधील भीषण वास्तवाचा VIDEO व्हायरल

Viral Video From Israel: युद्धात आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय.

Ruchika Jadhav

Israel Video:

इस्रायल आणि हमासमधील युद्धामुळे आतापर्यंत ३००० लोकांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस युद्धाच्या ज्वाला आणखीनच भडकताना दिसत आहेत. या युद्धात आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झालाय. लहान मुलं आणि वृद्धांसह जखमींची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. येथील अनेक थरारक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालेत. (Latest Marathi News)

सोशल मीडियावर सध्या एका अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ड्रायव्हर अॅम्ब्युलन्समध्ये बसून हताश होत रडतोय. युद्धात अनेक जण जखमी आहेत. या जखमींना वेळेत रुग्णालयात न पोहचवल्यास त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

मात्र एका अॅम्ब्युलन्समध्ये किती जणांना नेणार असाही प्रश्न आहे. आपण एवढ्या सगळ्यांचा जीव वाचवू शकत नाही अशी खंत मनात बाळगत हा ड्रायव्हार रडत आहे.

युद्धामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. यामुळे आरोग्या व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. आरोग्य व्यवस्थेवरील ताण इतका वाढला आहे की, औषधे आणि अॅम्ब्युलन्स देखील कमी पडत आहेत. देशात सुरू असलेला विध्वंस पाहून वाहन चालक फार भाऊक झाला.

बुधवारी सकाळी देखील इस्रायलकडून पुन्हा एकदा बॉम्बचा वर्षाव करण्यात आला. हमास आणि इस्रायल युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. युद्धात आतापर्यंत ३ हजार नागरिकांचा मृत्यू झालाय. यामध्ये महिला, लहान मुले आणि वयोवृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याती शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

SCROLL FOR NEXT