ishika taneja Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : सनातन धर्माच्या प्रसारासाठी मिस इंडिया बनली श्री लक्ष्मी? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

fact check ishika taneja :...तिने बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली...लाखो चाहत्यांचं प्रेम मिळवलं...ती मिस इंडिया झाली आणि राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला...मात्र, तिने आता सिने इंडस्ट्री सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय...अशी कोण आहे ती अभिनेत्री तिला साध्वी बनायचंय...पाहुयात हा रिपोर्ट...

Sandeep Chavan

...अभिनेत्री...

...मिस इंडिया...

...मिस वर्ल्ड टुरिझम...

...राष्ट्रपती पुरस्कार विजेती...

आणि आता साध्वी...

...ही अभिनेत्री आहे इशिका तनेजा...वय वर्षे फक्त 30...मात्र, अभिनय क्षेत्रात य़शाच्या शिखरावर असताना तनेजानं ग्लॅमर दुनिया सोडून आता अध्यात्माचा मार्ग पत्करलाय...इशिकाने महाकुंभमेळ्यात संन्यास घेऊन साध्वी झाल्याचा दावा करण्यात आलाय...मात्र, खरंच अभिनय सोडून

इशिका तनेजा साध्वी झालीय का...? तिने अचानक अभिनय क्षेत्र सोडून संन्यास का घेतलाय...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं की,अभिनेत्री, मिस इंडिया इशिका तनेजा महाकुंभात साध्वी बनलीय.तिने अभिनय क्षेत्र सोडून धर्माचा प्रसार सुरू केलाय'. अभिनेत्री तनेजा खरंच साध्वी झालीय का...? याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...आमच्या टीमने तनेजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला...त्यावेळी ती काय म्हणाली पाहुयात...त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

अभिनेत्री इशिका तनेजा साध्वी बनलेली नाही

सनातन धर्माच्या प्रसारासाठी गुरुदक्षिणा घेतलीय

इशिका श्रीलक्ष्मी बनून सनातन धर्माचा प्रसार करतेय

द्वारका-शारदापीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वतींकडून गुरु दीक्षा घेतली

गुरू मिळाल्याने जीवनाला दिशा मिळते

सनातन धर्माचा मी प्रचार करत असेल तर अडचण काय? असा सवालही तिने उपस्थित केला...तसंच चित्रपट निर्मितीची संधी मिळाली तर मी ते नक्कीच करेन, पण त्यातही सनातनचाच प्रचार करेन असं तनेजा म्हणाली...त्यामुळे आमच्या पडताळणीत इशिका तनेजा ही साध्वी झाल्याचा दावा असत्य ठरला...फक्त सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी गुरूदक्षिणा घेतल्याचं समोर आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT