मनसेच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Death Threat to MNS Leader in Maval: मावळमध्ये अवैध धंदे आणि अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात आवाज उठवणारे मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
MNS LEADER ASHOK KUTE
MNS LEADER ASHOK KUTEsaam tv
Published On: 

दिलीप कांबळे, साम टीव्ही

मावळ तालुक्यात अवैध धंदे आणि अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीविरोधात आवाज उठवणाऱ्या मनसेच्या तालुकाध्यक्षांनाच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मावळ तालुकाध्यक्ष अशोक कुटे यांना फोनवरून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MNS LEADER ASHOK KUTE
Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांची मोठी खेळी, भाजप अन् शिंदेसेनेला झटका; १०० पदाधिकाऱ्यांनी हाती घेतलं घड्याळ

अशोक कुटे यांनी मावळ तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात आवाज उठवत पोलिसांकडे निवदने दिली होती. तसेच अमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर एका फोनवरून तीन जणांनी संपर्क साधत त्यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कुटे यांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच तपासाअंती संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

MNS LEADER ASHOK KUTE
Weather Update: पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, ७ राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज; ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहणार

दरम्यान, अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाच जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.