Fact Check : माळा विकणारी मोनालिसा बनली मॉडेल? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO

Maha Kumbh Mela Viral Video: महाकुंभमेळ्यात माळा विकणाऱ्या मोनालिसाला तुम्ही पाहिलंच असेल...मात्र आता मोनालिसाचा नवीन लूक पाहा...मोनालिसा मॉडेल बनलीय...होय, तिच्या मॉडेलिंगचे व्हिडिओ व्हायरल करून तसा दावा करण्यात आलाय.
Maha kumbh Monalisa
Maha kumbh MonalisaGoogle
Published On

प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात निळ्या डोळ्यांची मोनासिला चर्चेत आली आणि अख्ख्या देशभरात व्हायरल झाली...आणि बघता बघता माळा विकणारी मोनालिसा स्टार बनली...मात्र, आता तिने माळा विकणं बंद करून मॉडेल बनल्याचा दावा करण्यात आलाय...तसे तिचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेयत...मात्र, खरंच मोनालिसा ही मॉडेल झालीय का...? तिने नवीन लूक केलाय का...?

ती आता मॉडेलिंग, सिनेमात काम करणार आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...या व्हिडिओसोबत एक फोटोही व्हायरल होतोय...या फोटोत दिसणारी तरुणी ही मोनालिसाच असल्याचा दावा करण्यात आलाय...मात्र, आम्ही याची पडताळणी केली...त्यावेळी तो फोटो दुसऱ्याच तरुणीचा असल्याचं समोर आलं...

व्हिडिओचे कीफ्रेम रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर व्हायरल व्हिडिओ क्रिएटर तनु रावत या युजरच्या इन्स्टाग्रामवर मूळ व्हिडिओ आढळला...तनु रावतने हा व्हिडिओ नोव्हेंबर 2024 रोजी अपलोड केला होता. यासोबत अनेक व्हिडिओ फोटो मोनालिसाचे व्हायरल करण्यात आलेयत...मात्र, हे तरी खरे आहेत का...? ते आम्ही पडताळून पाहिले...त्यावेळी आमच्या प़डताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

मोनालिसा मॉडेल बनल्याचा दावा खोटा

मोनालिसाचे फोटो, व्हिडिओ AI द्वारे बनवलेत

मोनालिसा अजूनही महाकुंभात माळाच विकतेय

AI ने बनवलेले फोटो व्हायरल करण्यात आले

मोनालिसा भोसलेचे व्हिडिओ फेस स्वॅप टेक्नोलॉजी वापरून तयार केलेयत...सध्या मोनालिसा ही ट्रेडिंगमध्ये आहे...काहींनी तिच्या प्रसिद्धीचा फायदा घेत असे व्हिडिओ तयार केले...आणि ही मोनालिसाच असल्याचा दावा केला...मात्र, आमच्या पडताळणीत मोनालिसाने नवीन लूक करून मॉडेलिंग केल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com