Fact Check : 3 रुपयांची गोळी हार्ट अटॅकपासून वाचवेल जीव? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO

heart attack medicine fact check : हार्ट अटॅक आल्यावर तुम्ही तुमचा जीव सहज वाचवू शकता...फक्त एक गोळी तुम्हाला जीवदान देईल...हे आम्ही का म्हणतोय...कोणती आहे ती गोळी ज्याने आपला जीव वाचू शकेल...याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Heart Attack News
Heart Attack Saam Tv
Published On

हार्ट अॅटॅक आल्यावर मोठ्या धोक्यापासून तुम्हाला डिस्प्रीन गोळी वाचवू शकते असा दावा करण्यात आलाय...खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? एक गोळी एवढी फायदेशीर आहे का...? कारण, लाखो लोकांना हार्टचा प्रॉब्लेम आहे...त्यामुळे या दाव्यात तथ्य असल्यास अनेकांना फायदा होऊ शकतो...मात्र, या दाव्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...

डिस्प्रीन या गोळीमुळे रक्ताच्या झालेल्या गाठी विरघळून जातात...आणि रक्तप्रवाह जोरात होऊन हार्टमुळे पुढील धोका कमी होतो असा दावा करण्यात आलाय...या दाव्यात तथ्य असल्यास अनेकांना फायदा होऊ शकतो...त्यामुळे ही माहिती जाणून घेणं गरजेचं आहे...याबद्दल अधिक माहिती हार्ट स्पेशालिस्ट देऊ शकतात...आमचे प्रतिनिधी एक्सपर्टला भेटले...त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवला आणि यामागचं सत्य जाणून घेतलं...

Heart Attack News
Viral News: सिगरेट सोडण्यासाठी माणसाचा अतरंगी उपाय, डोकं पिंजऱ्यात बंद करून बायकोकडे दिली चावी, पाहा व्हायरल पोस्ट

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय ?

हार्ट अटॅक आल्यावर डिस्प्रीन गोळी घ्यावी

डिस्प्रीनमुळे अटॅकवर तात्पुरती ट्रिटमेंट होते

डिस्प्रीनमुळे ब्लॉकेजेस काही प्रमाणात कमी होतात

डिस्प्रीन गोळी चावून खाल्ल्यास उपयुक्त ठरते

गोळी खाल्ल्यानंतर तातडीने उपचार घेणं गरजेचं

Heart Attack News
Viral News: नवरा बायको दारू पिऊन तर्राट, चकना दिला नाही म्हणून पत्नीने रस्त्यावरच नवऱ्याला धोपटलं

डिस्प्रीन टॅबलेट ही 300 मिलिग्राम घ्यावी आणि दाताने तोडून जिभेच्या खाली ठेवायची असं डॉक्टरांनी म्हटलंय...त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय...तसंच अॅस्प्रिन गोळीही हार्ट अॅटॅक आल्यावर फायदेशीर ठरू शकते...तरीदेखील तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com