Hindustani Bhau Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Hindustani Bhau Viral Video: माधुरी हत्तीण वादात हिंदुस्थानी भाऊची उडी; कोल्हापुरातील आंदोलकांना केली शिवीगाळ, व्हिडिओ

कोल्हापूरच्या नांदणी गावातील माधुरी हत्तीण वनतारामध्ये नेल्यामुळे वादंग माजलं आहे. हिंदुस्थानी भाऊने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली असून या प्रकरणावरून राजकीय चर्चा रंगली आहे.

Manasvi Choudhary

कोल्हापूरच्या नादंणी गावची माधुरी हत्तीण मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. माधुरी हत्तीण चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे हत्तीणीला वनतारा मध्ये नेण्यात आले आहे. माधुरीला नेल्यामुळे नांदणी गावातील नागरिक नाराज झाले आहेत. त्यांनी संताप व्यक्त केला मोर्चे काढत माधुरीला नेऊ नका अशी मागणी केली होती. मात्र तरीदेखील माधुरी हत्तीणीला वनतारामध्ये नेण्यात आले आहे.

माधुरी हत्तीण ही मागील ४० वर्षाहून अधिक काळ नांदणी गावात होती. त्यानंतर आता माधुरीला वनतारामध्ये नेण्यात आले आहे. सोशल मीडियावर देखील माधुरी हत्तीचे विविध व्हिडीओ आणि फोटो सध्या व्हायरल होत आहेत. अशातच आता हिंदुस्थानी भाऊ याने माधुरी हत्तीणीवर प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, मी हिंदुत्ववादी विषयावर कायमच वक्तव्य करत असतो. यामुळे माझे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले होते. बंद होते. जे आता नीट सुरू आहे. त्याने सांगितलं की खूप दिवसांनातर सोशल मिडिया हाताळल्यानंतर मला सर्वत्र चर्चा दिसते ती म्हणजे कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणीची.

कोल्हापूरची माधुरी हत्तीण हिच्यावरून देखील आता राजकारण सुरू झाले आहे. गेली इतके वर्ष ही हत्तीण कुठे होती? काय खात- पित होती? या विषयी कोणी राजकारण्यांनी विचारपूस केली नाही मात्र आता निवडणूका आल्यामुळे या हत्तीची काळजी करताना दिसत असल्याचं म्हटलं आहे. पुढे त्याने, माधुरी हत्तीणीच्या पायांना जखमा झालं असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय माधुरी हत्तीणीला कार्यक्रमात भाड्याने दिले जायचे मुक्या जनावरांना हे लोक भाड्याने देऊन त्यावर पैसे कमवायचे. असा हा एकप्रकारचा व्यवसाय सुरू होता असं त्याने सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Floods: बीड अन् लातूरामध्ये पावसाचा हाहाकार, पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू; पाहा फोटो

Jalgaon Guru Samman :'गुरुसन्मान' निमित्ताने जळगावात रंगला नाट्यकलावंतांचा मेळा

Pune Politics : पुण्यात 'ड्रोन शो'वरून ड्रामा; वसंत मोरेंच्या पोस्टनंतर भाजपकडून टीकास्त्र

Maharashtra Live News Update: अतिउत्साहीपणा नडला! कळंब बीचवर पर्यटकांची गाडी भरतीच्या पाण्यात अडकली

Matar Samosa Recipe : १० मिनिटांत बनवा खुसखुशीत मटार समोसा, हॉटेलसारखी चव मिळेल घरीच

SCROLL FOR NEXT