Shocking Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तरुणी बनवत होती रील, तितक्यात कोसळली वीज; VIDEO पाहून उडेल अंगाचा थरकाप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या राज्यभर जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. प्रत्येकजण पावसाळ्यानिमित्ताने अनेक पर्यटनस्थळी फिरायला जात आहे. पावसाळ्याच्या मनमुराद आनंद घेताना दिसतात. सर्व आनंदाचे प्रसंग सोशल मीडियावर ते शेअर करत असतात. मात्र याच पावसाळ्याच्या कधी कधी अनेक अपघातांच्या घटनाही समोर येत आहेत. कुठे वीज कोसळून काहीचे मृत्यू होण्याच्या घटना घडताना दिसून येत आहेत.त्यात तुमच्या मनाचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओ एक तरुणी पावसात रिल्स बनवत तिच्या काही अंतरावर जोरदार वीज पडते. या घटनेत तरुणी थोडक्यात बचावली जाते.

मनोरंजनाचे सर्वात लोकप्रिय असे माध्यम हे सोशल मीडिया (Media)आहे. लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण सोशल मीडियाचा वापर करत असतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घडलेला प्रसंग क्षणार्धात सर्वांपर्यंत सोशल मीडियामुळे समजला जातो. तसच काहीसा प्रकार बिहारमधून समोर आला आहे. सर्व प्रसंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक घराची गच्ची दिसून येत आहे. याच गच्चीवर एक तरुणी जोरदार पडणाऱ्या पावसात भिजताना सुरुवातीस दिसून येत आहे. काही वेळात तरुणी मोबाईवर व्हिडिओ सुरु करुन डान्स(Viral Video) करण्यास सुरुवात करते. मात्र काही वेळात त्या वेळी सुरु असलेल्या जोरदार पावसात तरुणीच्या पाठी असलेल्या काही अंतरावर जोरदार वीज कोसळते. वीज कोसळताच तरुणी घाबरुन तेथून निघून जाते. मात्र सर्व धक्कादायक प्रकार मोबाईलमध्ये सुरु असलेल्या व्हिडिओमध्ये कैद झाला आहे.

पावसात वीज कोसळणाऱ्या अनेक घटना याआधीही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या घटनेत अनेकदा काही व्यक्ती थोडक्यात बचावतानाही दिसतात. सध्या बिहारमधील हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X'एक्स' वरील '@sdcworldoffl' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल(Viral) होताच नेटकरी वर्गातून विविध प्रतिक्रिया या घटनेवर येत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

SCROLL FOR NEXT