Gautami Patil SAAM TV
व्हायरल न्यूज

Gautami Patil Viral video : आया माय, कितली मझानी बोलस व तू! गौतमीची अहिराणी आयकी का? VIDEO

Gautami Patil Latest News : गौतमी पाटीलची क्रेझ कायम आहे. महाराष्ट्रात तिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने नुकतंच एका कार्यक्रमात अहिराणी भाषा बोलली. तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : भारतात अनेक भाषा आहेत. प्रत्येक दोन किलोमीटरवर लोकांची भाषा बदलते असे बोललं जातं. आपल्या महाराष्ट्रातही प्रत्येक भागात वेगवेगळी भाषा बोलली जाते. राज्यातही कोकणी ते अहिराणी अशा अनेक भाषा बोलल्या जातात. प्रत्येकाला आपली भाषा प्रिय असते. राज्यात अहिराणी भाषा बोलणारा मोठा वर्ग आहे. राज्यातील धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ही भाषा बोलली जाते. या पट्ट्यात प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा जन्म झाला. त्यामुळे जन्माने धुळेकर असलेल्या गौतमी पाटील देखील मोठ्या अभिमानाने अहिराणी भाषा बोलते. तिचा अहिराणी भाषेत बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'होऊ दे धिंगाणा' या कार्यक्रमाला नृत्यांगणा गौतमी पाटीलने हजेरी लावली. या कार्यक्रमात गौतमी पाटीलने स्पर्धकांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर अहिराणी भाषा बोलून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता सिद्धार्थ जाधव करतोय.

या कार्यक्रमात गौतमी पाटील अहिराणी भाषेत म्हणाली,'मी आठवीपर्यंत धुळ्यात होते. मला मोजकी भाषा येते. मी आज 'होऊ दे धिंगाणा-३' या कार्यक्रमात आले आहे. मला खूप चांगलं वाटत आहे. मला मानसन्मान मिळतोय, त्यामुळे खूप चांगलं वाटत आहे. खूप छान वाटत आहे. आज सर्व कलाकारांसमोर उपस्थित आहे. हे माझं भाग्य समजते. तुमच्या सर्वांचे आभार मानते'.

गौतमी पाटीलने अहिराणी भाषा बोलल्यानंतर सिद्धार्थ जाधवने प्रतिक्रिया दिली. गौतमी पाटीलला उगाच 'कातील' म्हणत नाहीत, सिद्धार्थ म्हणाला. त्यानंतर गौतमी पाटील देखील लाजली. गौतमी पाटीलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका युजरने म्हटलं की, मला आनंद वाटला की, गौतमी पाटीलने अहिराणी भाषा बोलली'. यावेळी अनेकांनी तिचे कौतुक केले. सायली नावाच्या इन्स्टाग्राम युजरने शेअर केलेला व्हिडिओ ६६ हजारांहून अधिक जणांनी लाईक केला आहे. २०० हून अधिक जणांनी प्रतिक्रया दिल्या आहेत. तर २० हजारांहून अधिक जणांनी शेअर केला आहे.

दरम्यान, गौतमी पाटील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या गावात लहानची मोठी झाली. शिंदखेडा गावातच तिचं बालपण गेलं. तसेच तिथेच आठवीपर्यंत शिक्षण झाली. त्यानंतर याच गावातून नृत्यांगना म्हणून करिअरची सुरुवात झाली. सध्या गौतमी पाटील पुण्याला स्थायिक झाली आहे. गौतमी पाटीलचा पहिला मराठी चित्रपट 'घुंगरू' देखील सिनेमागृहात आला आहे. या चित्रपटात तिने अभिनेत्री म्हणून भूमिका निभावली. तसेच गौतमी पाटीलने अनेक सिनेमात आयटम साँग देखील केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DIY Homemade Rakhi : घरीच बनवा या सुंदर राखी डिझाईन्स, रक्षाबंधनाचा सण होईल खास

Train Accident : १०० प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरली

Kinetic DX EV: ४१ वर्षांनंतर कायनेटिक स्कूटर नव्या रंगात, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

Viral Video: मांडीवर मांडी अन् घट्ट मिठी, धावत्या रेल्वेत कपलचे अश्लील कृत्य; VIDEO व्हायरल

Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

SCROLL FOR NEXT