Gautami Patil viral video : चंद्रा गाण्यावर थिरकली गौतमी पाटील; व्हिडीओ व्हायरल

Gautami Patil Dance : गौतमी पाटीलचं नाव अख्या महाराष्ट्रात चांगलचं गाजतयं. गौतमी पाटील ही तिच्या नृत्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यास नेहमी पुढे असते. नुकताच गौतमी पाटीलचा चंद्रा गाण्यावरचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
चंद्रा गाण्यावर थिरकली गौतमी पाटील; व्हिडीओ व्हायरल
Gautami Patil viral video saam tv
Published On

गौतमी पाटीलचं नाव अख्या महाराष्ट्रात चांगलचं गाजतयं. गौतमी पाटील ही तिच्या नृत्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यास नेहमी पुढे असते. नुकताच गौतमी पाटीलचा चंद्रा गाण्यावरचा व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यात बेभान होऊन गौतमी डान्स करताना दिसत आहे. तिचे चाहते तिला पाहण्यासाठी नेहमीच तिच्या कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसतात.

राज्यामध्ये सध्या बीड हत्या प्रकरण व परभणी प्रकरणावरून राजकारण तापलेलं असताना अभिनेत्री प्राजक्ता माळीवर केलेल्या टीकेची बातमी सर्वत्र पसरली. यानंतर आता प्रसिद्ध असलेली नृत्यांगना गौतमी पाटील हिने प्राजक्ता माळी हिची बाजू घेत एक महत्वाची भुमिका मांडली. प्रतिक्रीया देताना गौतमी पाटील बदलापुरातल्या आगरी महोत्सवात उपस्थित होती. यावेळी तिच्यासोबत बातचीत आमचे प्रतिनिधी मयुरेश कळव यांनी केली. याचा व्हायरल व्हिडीओ खाली दिलेल्या लिंकवर मिळेल.

चंद्रा गाण्यावर थिरकली गौतमी पाटील; व्हिडीओ व्हायरल
Plane Crash : आणखी एक विमान दुर्घटना, दक्षिण कोरियानंतर कॅनडामध्ये क्रॅश झालं प्लेन

गौतमी पाटीलची प्रतिक्रीया

'' कलाकार हा कलाकार असतो त्याचं कोणासोबत नाव जोडून त्याची बदनामी करणं चुकीचं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलेली भूमिका योग्य असून आपण तिच्या भूमिकेचं समर्थन करतो, आपल्यालाही याआधी अशाच प्रकारे ट्रोल केलं गेलं होतं मात्र आपण खचून गेलो नाही त्यामुळे प्राजक्तानेही खंबीरपणे उभे राहून आपली कला सादर करत राहावी '' अशी प्रतिक्रिया गौतमी पाटील हिने दिली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भुमिका घेत अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना सुरेश धस यांनी काही अभिनेत्रींच्या नावांचा उल्लेख केला. त्यात मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेत त्यांनी गंभीर आरोप केले. त्यावर शनिवारी प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. प्राजक्ता माळीने आमदार सुरेश धस यांच्याविरोधात महिला आयोगात धाव घेतली आहे.

प्राजक्ता माळी काय म्हणाली?

राजकीय वर्तुळात अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबाबत चर्चा सुरू झाल्यावर प्राजक्ताने स्पष्ट भुमिका मांडली. प्राजक्ता म्हणाली,''परळीला कधीच पुरुष कलाकार गेला नाही का? मग कार्यक्रमाला त्यांची नावं का घेत नाहीत. इव्हेंट मॅनेजमेंटचं सांगायचं झालं तर पुरूष कलाकारांचं नाव घेतात. महिला कलाकार छोट्या कुटुंबातून येऊन संघर्ष करतात, पुढे येतात आणि तुम्ही असं बोलून त्यांचं नाव डागळता. मान्यवरांसोबतचे फोटो, नेत्यांसोबतचे फोटो रेफरन्स म्हणून उचलून तुम्ही कुणाचही नाव जोडता का? असं स्पष्ट मत प्राजक्ता माळी हिने व्यक्त केलं.

Written By : Sakshi jadhav

चंद्रा गाण्यावर थिरकली गौतमी पाटील; व्हिडीओ व्हायरल
Dry Hair Remedy : ड्राय झालेल्या केसांना वैतागलात? मग हा घरगुती उपाय एकदा करून पाहाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com