Plane Crash : आणखी एक विमान दुर्घटना, दक्षिण कोरियानंतर कॅनडामध्ये क्रॅश झालं प्लेन

Air Canada flight made a scary landing, Watch Video : उत्तर कोरियामधील विमान अपघाताची बातमी ताजी असतानाच कॅनडामध्येही विमान दुर्घटना घडली आहे. लँडिंग गिअर तुटल्यामुळे कॅनडामध्ये विमान अपघात झालाय. अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Air Canada Plane Crash Landing Gear Failure Causes Accident at Halifax Airport  Video Goes Viral
Air Canada Plane Crash
Published On

Air Canada Flight Accident : दक्षिण कोरिया विमान अपघाताची घटनेला काही तास झाले असतानाच आणखी एका विमानचा अपघात झालाय. एअर कॅनडाच्या विमानाला Halifax Airport वर लॅन्डिंगच्या वेळेस अपघात झाल्याचं समोर आलेय. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झालाय. अपघातामध्ये अद्याप जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या अपघातामध्ये काही प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. लँडिंग गिअर तुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्रथामिक माहिती मिळाली आहे. (Air Canada Plane Crash Landing Gear Failure Causes Accident at Halifax Airport Video Goes Viral)

कझाकिस्थानमध्ये गेल्या आठवड्यात लँडिंगवेळी विमानाचा अपघात झाला होता. त्यानंतर आज उत्तर कोरियामध्येही लँडिंग करताना विमानाचा अपघात झाला. रनवेवरील भिंतीला जाऊन विमान धडकले. या अपघातामध्ये १७९ जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितलेय. या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात असतानाच कॅनडामध्येही आज विमान अपघाताचे वृत्त समोर आलेय. येथील Halifax Airport वर लँडिंग वेळेस अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. याचा व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. विमानाचं चाक घासलं गेल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर आग लागली आहे. दरम्यान यामध्ये प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

Air Canada Plane Crash Landing Gear Failure Causes Accident at Halifax Airport  Video Goes Viral
Plane Crash : विमान रनवेवर उतरताच भिंतीला धडकलं, १७९ जणांचा मृत्यू, धक्कादायक VIDEO व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटना घडत आहेत. कझाकिस्थान आणि उत्तक कोरियामधील अपघातानंतर कॅनडामध्ये विमानाचा अपघात झालाय. सुदैवाने या अपघातात कुणाचाही मृत्यू झाला नाही. प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे. खराब हवामान आणि धुके विमान अपघाताचे प्रमुख कारण, असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. कॅनडातील अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, PAL एअरलाइन्सचे विमान क्रमांक AC2259 सेंट जॉन्स येथून टेकऑफ झाले, हॅलिफॅक्स विमानतळावर लँडिंगसाठी रनवेवर उतरणार होते. त्याचवेळी लँडिंग गिअर तुटल्याने आग लागली. सुदैवाने कोणताही जिवितहानी झालेली नाही. या विमानात किती लोक होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या अपघातानंतर अवघ्या काही तासांत कॅनडात दुर्घटना घडली आहे.

Air Canada Plane Crash Landing Gear Failure Causes Accident at Halifax Airport  Video Goes Viral
Plane Crash : १८१ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान लँडिंगवेळी क्रॅश, २८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com