Car Crash Viral Video x
व्हायरल न्यूज

Car Crash : महिला वकिलाचे कारवरील नियंत्रण सुटले, रिव्हर्स घेताना अपघात; घटनेचा Video Viral

Accident Viral Video : सोशल मीडियावर एका महिला वकिलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये वकिलाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.

Yash Shirke

  • एका महिला वकिलाचे तिच्या कारवरील नियंत्रण सुटले.

  • यामुळे तिच्या कारचा अपघात झाला.

  • हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली.

  • या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओची सध्या चर्चा पाहायला मिळत आहेत. एका पंचतारांरित हॉटेलमध्ये एका महिला वकिलाची कार अनियंत्रित झाली आणि कार थेट हॉटेलच्या मुख्य काचेच्या दरवाज्यावर जाऊन आदळली. या धडकेने दरवाजा फुटला आणि काचेचे तुकडे सर्वत्र विखुरले गेले.

प्राथमिक माहितीनुसार, सदर घटना हॉटेलच्या पिकअप पाॅइंटवर घडली. संबंधित महिला वकील तिच्या कारमध्ये थांबलेली होती. तेव्हा परिसरात इतर पाहुण्यांची वाहने देखील होती. तेवढ्यात अचानक कारने मागे जात वेगात उलटी धाव घेतली. ती कार थेट हॉटेलच्या काचेच्या दरवाज्यावर जाऊन धडकली. सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. फक्त काही गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेक युजर्सनी हा प्रकार चित्रपटातील स्टंटसारखा वाटल्याचे म्हटले आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, अपघाताच्या महिला वकिलाने तिच्या कारवरील नियंत्रण गमावले होते.

अपघाताचा व्हिडीओ @Deadlykalesh या एक्स अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ लाखो यूजर्संनी पाहिला आहे. काही युजर्संनी यावर विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी या घटनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संंबंधित अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: आझाद मैदानावर जेवण बंद, शौचालयाला कुलूप; मनोज जरांगे भडकले, VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पूर्ण पाठिंबा - छत्रपती संभाजीराजे

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

Mega Block : ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होणार, रविवारी मध्य-हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक; पाहा वेळापत्रक

Ajit Pawar Slams Laxman Hake: विनाशकाले विपरीत बुद्धि! मी त्याला किंमत देत नाही; अजित पवार संतापले|VIDEO

SCROLL FOR NEXT