Fact Check  Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : ड्राय डेलाही दारू मिळणार? ड्राय डेबद्दल सरकारने निर्णय बदलला?

dry day viral news : आम्ही व्हायरल मेसेजची पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो...आता ड्राय डेलाही दारू मिळणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच आता सरकारने निर्णय बदललाय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

आता ड्राय डेलाही दारू मिळणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...होळी, मोहरम, गांधी जयंतीलाही दारू मिळणार असा दावा मेसेजमध्ये करण्यात आलाय...पण, खरंच आता सरकारने ड्राय डेबद्दल निर्णय बदललाय का...? अचानक असा निर्णय सरकारने का बदलला...? कारण, असा निर्णय बदलला असेल तर याची माहिती मिळायला हवी...कारण, ड्राय डेला दारू दुकानं उघडल्यास कारवाई केली जाते...आता मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे की, होळी, मोहरम आणि गांधी जयंती दिनी दारुची दुकाने उघडण्यास परवानगी'.

हा मेसेज व्हायरल होतोय...त्यामुळे सरकारने असा निर्णय घेतलाय का...? याची माहिती मिळवणं गरजेचं आहे...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याची सत्यता जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेतली...याबाबत स्टेट एक्साईज डिपार्टमेंट माहिती देऊ शकतं...आमचे प्रतिनिधी अधिकाऱ्यांना भेटले...त्यांना मेसेज दाखवला आणि अधिक माहिती जाणून घेतलं...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य

ड्राय डेला दारूची दुकानं बंदच राहणार

ड्राय डेला दारू दुकानं उघडी असल्यास कारवाई होते

राज्यात वर्षभरात 8 ड्राय डे असतात

काही स्थानिक पातळीवरही प्रशासन निर्णय घेतं

राज्यात वर्षभरात 8 दिवस ड्राय डे असतात...ते कोणते दिवस आहेत त्यावरही एक नजर टाकूयात...

ड्राय डे कधी असतो?

15 ऑगस्ट

26 जानेवारी

1 मे

गांधी जयंती

गांधींची पुण्यतिथी

गणेश विसर्जन

आषाढी एकादशी

कार्तिकी एकादशी

ड्राय बद्दल असा कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही...होळी आणि मोहरमला ड्राय डे नसतो...त्यामुळे आमच्या पडताळणीत आता ड्राय डेलाही दारूची दुकाने उघडण्यास परवानगी असल्याचा दावा असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jal Jeevan Mission scam: 960 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी IAS अधिकाऱ्याला अटक; ACB ची मोठी कारवाई

जगाच्या नकाशावर आणखी एका देशचा उदय होणार? इराण-अमेरिका युद्धादरम्यान मोठी घडामोड

केरळमध्ये डावे हरले तर देशातून 'कम्युनिस्ट सरकार' पूर्णपणे संपणार?

इराण मुस्लीम देशांचा नवा लीडर? आखाती युद्धामुळे बदलणार गणित?

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर भीषण आग पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT