पोलीस महानिरीक्षकांना अटक होणार? पोलीस दलात खळबळ

andhra pradesh news : बिहारच्या पोलीस महानिरीक्षकांना अटक होण्याची शक्यता आहे. यासाठी आंध्र प्रदेशचे पोलीस त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
andhra pradesh
andhra pradesh news Saam tv
Published On
Summary

आंध्र प्रदेशमधील विशेष पथक बिहारमध्ये दाखल

आयपीएस सुनील नायक यांच्या निवासस्थानी पोहोचलं पथक

ते सध्या अग्निशमन विभागाचे पोलीस महानिरीक्षक

बिहारच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशमधील विशेष पथक आयपीएस अधिकारी एम. सुनील नायक यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे. बिहारमधील शास्त्रीनगर पोलीस स्टेशनच्यी सरकारी निवासस्थानर सकाळी सकाळी पोलिसांचं पथक पोहोचलं. सुनील नायक हे सध्या बिहारच्या अग्नीशमन विभागाच्या पोलीस महानिरिक्षक पदावर नियुक्त आहेत.

andhra pradesh
इंजेक्शन लावून सफरचंद विक्रीचा आरोप, चौकशीत निर्दोष सापडला; आता विक्रेत्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ

काय आहे संपूर्ण प्रकरण?

संपूर्ण प्रकरण २०२१ सालातील आहे. आंध्र प्रदेशच्या गुन्हे अन्वेषण विभागात होते. त्यांच्यावर एका माजी खासदारांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांना ट्रान्झिट रिमांडवर आंध्र प्रदेशात नेण्याची तयारी सुरू आहे.

एम. सुनील नायक हे २०२१ साली आंध प्रदेश सीआयडीमध्ये कार्यरत होते. त्यांच्या आदेशानंतर तत्कालीन खासदार रघुराम कृष्णा राजू यांना अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर बेदम मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणी रघुराम कृष्णा राजू कोर्टात गेले. त्यानंतर कोर्टात एम. सुनील नायक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

आयपीएस सुनील नायक यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०७ अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला. माजी खासदाराने आरोप केला होता की, 'नायक यांनी कोठडीत जीवघेणा हल्ला केला. यामुळे मा‍झ्या जीवाला धोका धोका निर्माण झाला होता'. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

andhra pradesh
कुत्रा चावला, रेबिज होण्याच्या भीतीनं अस्वस्थ; भेदरलेल्या तरुणानं केली आत्महत्या

जामीन रद्द झाल्याने अटक होणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील नायक यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला होता. परंतु त्यांचा अटक पूर्व जामीन फेटाळण्यात आला. जामीन रद्द झाल्याने आंध्र प्रदेश पोलीस अलर्ट झाली. त्यानंतर पटनाच्या शास्त्री नगर येथील निवासस्थानी पोलीस पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com