इंजेक्शन लावून सफरचंद विक्रीचा आरोप, चौकशीत निर्दोष सापडला; आता विक्रेत्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ

kalyan latest news : इंजेक्शन लावून सफरचंद विक्रीच्या आरोपानंतर विक्रेता चौकशीत निर्दोष सापडला.आता विक्रेत्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
इंजेक्शन लावून सफरचंद विक्रीचा आरोप, चौकशीत निर्दोष सापडला; आता विक्रेत्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ
Published On
Summary

इंजेक्शन लावून सफरचंद विकतो म्हणून फळ विक्रेत्याला केली होती कल्याण पूर्वेत मारहाण

दोन महिने उलटून नही अन्न औषध प्रशासन विभागाकडून अहवाल नाही

फळ विक्रेत्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात इंजेक्शन लावून सफरचंद विकतो असा आरोप करत एका फळ विक्रेत्याला काही मनसे कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासन विभागाने घेतलेल्या सफरचंदाच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने संबंधित फळ विक्रेता मोहम्मद इरफान व त्यांचे कुटुंब चिंतेत आहे.

दोन महिन्यांपूर्वी कोळसेवाडी येथे काही तरुणांनी इरफान यांना इंजेक्शन मारून सफरचंद विकतोस, तुला येथे व्यवसाय करू देणार नाही असा आरोप करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर इरफान यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे नेले. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर कोणताही गुन्हा आढळला नसल्याने त्यांना सोडून दिले व जप्त केलेल्या सफरचंदांचे नमुने तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याकडे पाठवले.

मात्र ९ डिसेंबर २०२५ रोजी नमुने घेतल्यानंतरही दोन महिने उलटून अहवाल न आल्याने कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. सफरचंदामध्ये प्रत्यक्षात कोणतेही इंजेक्शन देण्यात आले होते की नाही, याबाबत अधिकृत शहानिशा अद्याप झालेली नाही.इरफान यांची पत्नी शबाना बानू यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला लेखी पत्र पाठवून लवकरात लवकर विश्लेषण अहवाल द्यावा, अशी मागणी केली आहे.

इंजेक्शन लावून सफरचंद विक्रीचा आरोप, चौकशीत निर्दोष सापडला; आता विक्रेत्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ
PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मारहाणीच्या व्हिडिओमुळे कुटुंबाची बदनामी होत असून त्यावर आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अहवाल आल्यानंतर तो पोलिसांकडे सादर करून संबंधित व्हिडिओ हटविण्याची तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

इंजेक्शन लावून सफरचंद विक्रीचा आरोप, चौकशीत निर्दोष सापडला; आता विक्रेत्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ
२८ वर्षांच्या तरुणीचं ६० वर्षीय मॅनेजरशी सूत जुळलं; दोघांनी पळून जाऊन लग्न केलं, फोटो व्हायरल झाल्यानंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ

या प्रकरणामुळे इरफान यांचा व्यवसाय ठप्प झाला असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. दरम्यान, शबाना बानू यांनी भाजप आमदार सुलभा गायकवाड यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. गायकवाड यांनी संबंधितांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अहवाल कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com