ATM machine x
व्हायरल न्यूज

Fact Check : आता ATM मधून पैसे निघणार नाहीत? पाकिस्तानच्या सायबर अटॅकमुळे ATM सेवा बंद?

Fact Check News : तुम्ही एटीएममधून पैसे काढणार असाल तर वेळीच सावध व्हा...कारण, एटीएममध्ये व्हायरस घुसलाय असा दावा करण्यात आलाय...यामुळे एटीएममधून पैसे काढता येणार नाहीत असा दावा केल्याने आम्ही याची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

भारत-पाकिस्तान युद्धावेळी एका व्हायरसने सायबर अटॅक केल्यामुळे एटीएममधून पैसे काढलात तर तुमच्याच खात्यातून पैसेही गायब होऊ शकतात असा दावा करण्यात आलाय...या दाव्यामुळे सगळ्यांच्याच मनात भीती निर्माण झालीय...मग आता एटीएममधून पैसे काढायचे की नाही? असा प्रश्न उपस्थित झालाय...त्यामुळे याचं सत्य सांगणं गरजेचं आहे...त्याआधी व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेज

ATM सेवा बंद होणार. लवकरात लवकरच पैसे काढून घ्या. भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना रॅनसमवेअर नावाच्या व्हायरसने सायबर अटॅक केला. त्यामुळे काम सुरू आहे. ऑनलाईन ट्रांजेक्शन करू नका, डान्स ऑफ द हिलरी नावाने व्हिडिओ कॉल्स आल्यास उचलू नका.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...कारण, आता शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात एटीएमचा वापर केला जातो...त्यामुळे याचं सत्य जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने एक्सपर्टकडून अधिक माहिती मिळवली...तसंच पाकिस्तानने भारतातील एटीएमवर सायबर अटॅक केलाय का...? याची माहिती आम्ही मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

- ATM बंद होणार हा दावा पूर्णपणे खोटा

- एटीएमवर कोणताही सायबर अटॅक झालेला नाही

- एटीएम सेवा सुरूच असून, व्यवहार सुरक्षित

- लोकांची दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल

त्यामुळे आमच्या पडताळणीत एटीएम पैसे निघणार नाहीत हा दावा असत्य ठरलाय...असे मेसेज दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केले जात असून, त्यावर विश्वास ठेवू नका...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

MI Coach: मुंबई इंडियन्सला मिळला नवीन कोच; 'या' अनुभवी खेळाडूवर संघाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT