Fake Currency report  Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : 500 रुपयांच्या नोटा बंद होणार? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO

Fake note : 500 रुपयांची नोट आता बंद होणार आहे...ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल...मात्र, असा दावा करणारा व्हिडिओ समोर आलाय...यामध्ये तारीखही सांगण्यात आलीय...पण, खरंच 500 ची नोट बंद होणार आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

हा दावा ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल...चलनातून 500 रुपयांच्या नोटा बाद होणार आणि त्या नोटांची छपाईही बंद केलीय असा दावा करण्यात आलाय...या दाव्यामुळे एकच खळबळ उडालीय...या व्यक्तीने काय दावा केलाय पुन्हा एकदा ऐका...

500 रुपये आणि बंद होणार असा दावा म्हणजे सगळ्यांसाठीच अत्यंत महत्त्वाचा विषय...एखादी 20, 30 रुपयांची छोटी वस्तू घ्यायची असेल 500 रुपये सुट्टे करणं म्हणजे अनेकांना टेन्शन येतं...दुकानदारही सुट्टे पैसे देत नाहीत...आणि आता चक्क 500 रुपयांची नोटच बंद होणार असा दावा केल्यानं अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय...500 ची नोट बंद झाली तर दुसरी नोट चलनात येणार आहे का...? 500 ची नोट बंद होणार असेल तर आपल्याकडे असलेल्या 500 रुपयांचं काय करायचं...?

असे अनेक सवाल उपस्थित होत असल्याने आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली...जशी 2 हजारांची नोट चलनातून बाद झाली तशी 500 रुपयांचीही नोट बंद होऊ शकते असं अनेकांना वाटू लागलंय...त्यामुळे खरंच ही नोट बंद होणार आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...याबाबत बँकींग क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या एक्सपर्टशी आमची टीम भेटली...आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य

2026 मध्ये 500च्या नोटा बंद होणार ही अफवा

सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणारा

500 रुपयांची नोट चलनात कायम राहणार

लोकांमध्ये भ्रम पसरवण्यासाठी मेसेज व्हायरल

असे दावा लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी केले जातात...पैशांचा विषय या प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय असल्याने सगळेच याची चर्चा करतात...मात्र, आमच्या पडताळणीत 500 रुपयांची नोट चलनातून बाद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage symptoms: हृदयाच्या नसा ब्लॉक होण्यापूर्वी ही लक्षणं ओळखा; हार्ट अटॅक टाळण्यासाठी वेळेत घ्या काळजी

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र धर्म वाढवूया,मराठीची गुढी उंच उभी करुया- देवेंद्र फडणवीसांकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याला करा गोडाचा बेत! १० मिनिटांत बनवा तांदळाची खीर, सोपी रेसिपी वाचा

Sangli : नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकाची निर्घृण हत्या; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मृतदेह सापडला, सांगलीतील धक्कादायक घटना

US Iran conflict : अमेरिकेनं इराणवर डागला बंकर बॉम्ब, इराणनं प्रतिहल्ला केल्यास काय होणार?

SCROLL FOR NEXT