नमस्कार मी शिवाजी शिंदे, व्हायरल सत्य-असत्यमध्ये आपलं स्वागत. आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो.तुम्ही वापरत असलेलं इन्स्टाग्राम आता बंद होणार आहे. होय, सरकार इन्स्टाग्रामवर बंदी आणणार असल्याचा दावा करण्यात आलाय. ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण, सरकारने अचानक असा का निर्णय घेतलाय? खरंच इन्स्टाग्राम बंद होणार आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
.तुम्ही वापरत असलेल्या इन्स्टाग्रामवर सरकार आता बंदी आणणार असल्याचा दावा करण्यात आलाय.देशभरात कोट्यवधी लोक इन्स्टाचे युजर्स आहेत. दिवसरात्र बरेच जण इन्स्टावर व्हिडिओज फोटो पाहत असतात. पोस्टही करत असतात. बऱ्याच जणांचे लाखो फॉलोअर्सही आहेत..काहींना यातून मोबदलाही मिळतो.आता इन्स्टावर सरकार बंदी आणणार असल्याचा दावा केल्यानं खळबळ उडालीय. या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.
भारत सरकार 25 ऑगस्ट 2026 च्या रात्रीपासून देशात इंस्टाग्रामवर बंदी घालत आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेक इन्स्टा युजर्सना धडकी भरलीय. सरकारने असा निर्णय का घेतलाय? खरंच सरकार आता इन्स्टावर बंदी आणणार आहे का? हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेक इन्स्टा युजर्सना धडकी भरलीय.
देशभरातील झेनजींच्या आंदोलनानंतर हा निर्णय सरकारने घेतलाय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली. याबाबत आम्ही माहिती मिळवली असता सरकारच्या अधिकृत पीआयबीवरून अपडेट्स मिळाली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.
भारत सरकारने इन्स्टाग्रामवर बंदी घातलेली नाही
इन्स्टाग्रामवर बंदी ही दिशाभूल करणारी पोस्ट
झेनजीच्या आंदोलनामुळे चुकीची पोस्ट व्हायरल
इन्स्टा बंद करण्याचा सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. सध्या देशभरात झेनजींचं आंदोलन गाजलं. इन्स्टावरील अनेक रिल्स व्हायरल झाल्या. मंत्र्यांवरही जोरदार टीका करण्यात आली. त्यामुळेच आता इन्स्टावर सरकार बंदी आणणार असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, आमच्या पडताळणीत सरकार इन्स्टावर बंदी आणणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.