Fact Check: E20 पेट्रोल वापराल, विम्याला मुकाल? गाडीचं नुकसान झाल्यास भरपाई नाही?

Truth Behind Viral Message: आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता दावा करण्यात आलाय की E20 पेट्रोलचा वापर कराल तर विम्याला मुकाल...होय असा दावा करण्यात आलाय...त्यामुळे वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय...पण, खरंच E20 पेट्रोलमुळे विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळत नाही का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
E20 FUEL INSURANCE CLAIM FACT CHECK:
E20 FUEL INSURANCE CLAIM FACT CHECK:saam tv
Published On

भारतात पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण आता वाढतंय...त्यातच आता मोठा दावा करण्यात आलाय...E20 इंधन वापरलं तर विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळणार नसल्याचा दावा केलाय...E20 म्हणजे 80 टक्के पेट्रोल आणि 20 टक्के इथेनॉल...सरकार हे मिश्रण आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न करतंय...आता E20 इंधनामुळे विम्याचा दावा नाकारला जातो...पण, या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

हा मेसेज व्हायरल होतोय...त्यामुळे अनेकांमध्ये संभ्रम आहे...आता गाड्यांमध्ये E20 इंधन वापरलं जातंय...त्यामुळे खरंच या मेसेजमधील दाव्यात तथ्य आहे का...? गाडीचं नुकसान झाल्यास इन्सुरन्स कंपनीकडून नुकसान भरपाई मिळत नाही का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...अनेकांकडे गाड्या आहेत...त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती ही इन्सुरन्स कंपनी आणि सरकारकडून मिळू शकते...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याबाबत माहिती मिळवली असता...सरकारकडून याबाबत अधिकृत माहिती मिळाली...

E-20 इंधनाचा वापर केल्यास वाहन विमा पॉलिसी पूर्णपणे वैध

E-20 इंधन वापरल्यामुळे भरपाई मिळणार नाही हा दावा खोटा

वाहनांसाठी आधी जो नियम होता तोच लागू राहिल

E-20 इंधनामुळे विम्यामध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत

सध्या E20 इंधनामुळे गाड्या खराब होतात अशी चर्चा आहे...त्यामुळे अनेकांमध्ये संभ्रम आहे...आता हा मेसेज व्हायरल झाल्याने गाड्यांचं झालेलं नुकसान विमा कंपन्या देणार का...? याबाबत शंका असल्याने आम्ही याची पडताळणी केली...त्यामुळे आमच्या पडताळणीत E20 इंधन वापरल्यास विम्याचा लाभ मिळणार नसल्याचा दावा असत्य ठरलाय...त्यामुळे अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com