Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: सणासुदीलाही कामावर निघालेल्या दमलेल्या बाबाची कहाणी; लोकलमधल्या गर्दीतला हृदयस्पर्शी Video बघून डोळे पाणावतील!

Mumbai Local Train: सोशल मीडियावर सध्या मुंबई लोकल ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओत दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मनोगत दिसून येत आहे.

Tanvi Pol

Local Train Viral Video: सुट्टीचा दिवस आपल्यापैंकी प्रत्येकाला हवा हवासा वाटतो. शाळेपासून ते कॉलेजला जातो तस तस सु्ट्टी आपल्याला मिळत असते. मात्र आयु्ष्यात जस जबाबदारीच वोझ अंगावर येत तस प्रत्येक सणसुद्धा आणि प्रत्येक सुट्टीसुद्धा कामात बदलते. मग दिवाळी सारखा सण असो किंवा गणपतीच्या सुट्टया. सुट्टीच्या दिवशी सुद्धा आपल्याला कामाला जाणारे अनेक व्यक्ती दिसून येतात. सध्या सोशल मीडियावर याच संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका तरुणाला आपले वडील सुट्टीच्या दिवशी का कामाला जायचे, याचे कारण समजले. नक्की काय असेल या व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहाच.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, लोकल ट्रेन दिसून येत आहे. ही मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकल ट्रेन आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पुढे पाहू शकता की, आज चक्क लोकल ट्रेनमधील महिला न दिसून येत नाही तर त्या व्हिडिओत पुरुष प्रवाशी दिसून येत आहे. अर्थात लोकल ट्रेनमधील(Local Train) पुरुष कंपार्टमेंट दिसत आहे, ज्यात अनेक पुरुष प्रवाशांची तूफान गर्दी आहे. व्हिडिओ व्हायरल होताच व्हिडिओच्यावर लिहिले आहे की, 'हळूहळू कळायला लागल की बाप सणासुदीला पण कामाला का जायचा' हे लिहिले आहे त्यातून एका तरुणाने संपूर्ण गर्दीचा व्हिडिओ टिपला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.

लोकल ट्रेनमधील व्हिडिओ 'इन्स्टाग्राम' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवरील ''atul_ghadigaonkar'' या अकाउंटवर सात दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत,''हळूहळू कळायला लागल की बाप सणासुदीला पण कामाला का जायचा'' असे भावनिक कॅप्शन देण्यात आलेलेले आहे.

नेटकऱ्यांच्या भावनिक प्रतिक्रिया पाहाच..

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल होताच तब्बल लाखोंच्या घरात नेटकऱ्यांच्या मनाशी जोडला गेला आहे. त्यामुळे व्हिडिओला अनेक लाईक्स मिळत असून व्ह्यूज दिवसेंदिवस वाढत आहेत. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''"जेव्हा आयुष्यातून बाप नावाची चादर उडून जाते ना, तेव्हा येणारी प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते...!''

दुसऱ्या एकाने,''मुलगा पण असा पाहिजे.. बापाला म्हणायला पाहिजे कि papa तुम्ही आराम करा मी करून घेतो सगळं काम'' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,''बाप" बाप त्या दिव्यातल्या वाती सारखा असतो, कि जेणे करुण आपले कुटुंब हे अंधारात जाता कामा नये ,म्हणून तो सतत जळत असतो, फक्त आपल्या पिंल्लासाठी'' अशा वडिलांवर आधारित भावनिक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT