Dubai Shopping Complex Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दुबईच्या पुरातून बाहेर काढण्यासाठी अप्रतिम बिझनेस आयडिया; चक्क शॉपिंग कार्टमध्ये बसवून लोकांना नेले बाहेर

Dubai Shopping Complex Viral Video: काही दिवसांपूर्वी दुबईत मुसळधार पाऊस झाला होता.त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना काहीच सुविधा उपलब्ध नव्हती. याचसाठी दुबईतील नागरिकांनी एक जुगाड केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काही दिवसांपूर्वी दुबईत मुसळधार पाऊस झाला होता. मुसळधार पावसामुळे पूराची स्थिती तयार झाली होती. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना काहीच सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे दुबईतील नागरिकांनी एक जुगाड केला आहे. दुबईतील लोकांनी एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी शॉपिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कार्टचा वापर केला आहे. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत दुबईतील एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये खूप जास्त पाणी भरलेले दिसत आहे. या कॉम्प्लेक्समध्ये पाणी भरल्याने लोक पुराच्या पाण्याच अडकलेले दिसत आहे. या लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी एक अनोखा जुगाड केला आहे. लोकांना शॉपिंग कार्टमध्ये बसवून त्यांना घेऊन जाताना दिसत आहे. लोक शॉपिंग कार्टमध्ये बसून शॉपिंग कॉम्पलेक्सच्या बाहेर जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शॉपिंग कॉम्प्लेक्समधील स्टाफ इतर लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. यासाठी स्टाफ मेंबर इतर लोकांकडून पैसे घेत आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

just.lol.things या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आली आहे. या व्हिडिओवर 'दुबईचा पाऊस= नवीन बिझनेस सेटअप', असं लिहण्यात आलं आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'दुबईतील लोकांनी आता जॉब सोडून नवीन बिझनेस स्टार्टअप सुरु करायला हवे', 'या परिस्थितीतही त्यांना एवढी भारी आयडिया सुचली आहे, त्यासाठी कौतुक', अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh: 64 घरांची राणी वर्ल्डकप विजेत्या दिव्या देशमुखबद्दलच्या 'या' 10 गोष्टी जाणून घ्या

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

Pune News: पुण्यात दिवसभरात दुसरी आत्महत्या; तृतीयपंथीनं खडकवासला धरणात उडी मारून मृत्यूला कवटाळलं

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT