Dombivli Local Train Saam TV
व्हायरल न्यूज

Dombivli Local Train: अरे ड्रायव्हरला तरी जागा द्या! प्रवाशी लोको पायलटच्या डब्ब्यात, खचाखच भरलेल्या ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल

Dombivli Local Train: मात्र डोंबिवली ट्रेनमध्ये काही प्रवाशांनी मोटामनच्या डब्ब्यातून देखील प्रवास केला आहे.

Ruchika Jadhav

Dombivli News: पावसाळ्यात मुंबईकरांचे मोठे हाल होतात. पावसाचे पाणी रेल्वे रुळांवर आल्याने मोठी गर्दी होते. या जिवघेण्या गर्दीतून नागरिक रोजचा प्रवास करतात. ट्रेनला जरा जरी उशिर झाला तरी त्यातील गर्दी झपाट्याने वाढते. मध्य रेल्वेस्टेशच्या प्रवाशांना या गर्दीचा सर्वाधिक त्रास करवा लागतो. (Latest Marathi News)

अशात सोशल मीडियावर सध्या एका लोकल ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबईकरांच्या जिवनाची व्यथा सांगणारा आहे. ट्रेनमध्ये कितीही गर्दी असली तरी देखील प्रवाशी मोटारमनच्या डब्ब्यात बसू शकत नाहीत. मात्र डोंबिवली ट्रेनमध्ये काही प्रवाशांनी मोटारमनच्या डब्ब्यातून देखील प्रवास केला आहे.

ठाणे आणि त्यापुढे असलेल्या मुंबईच्या उपनगरांमध्ये लोकलसेवा तितकीशी चांगली नाही. ट्रेनची संख्या कमी असल्याने कर्जत आणि कसारा मार्गे जाणाऱ्या नागरिकांची मोठी दाणादाण होते. गेल्या महिन्यात मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली होती.

या परिस्थितीत अनेक नागरिक रेल्वे स्थानकांत अडकून होते. अशात पाणी ओसरल्यानंतर पहिली ट्रेन सुटल्यावर त्या ट्रेनला नागरिकांची तुफान गर्दी होती. त्यामुळे हा व्हिडीओ या दरम्यानचा असण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्यात. काहींनी यावर हस्यास्पद कमेंट केल्यात तर काहींनी लोकोपायलटचे परिस्थिती समजून घेतल्याबद्दल आभार मानलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आम्ही लोकशाही संपू देणार नाही - रामलीला मैदानावरून राहूल गांधी

Nauvari Saree Draping: नऊवारी नेसायला जमत नाही? मग सुंदर मराठमोळ्या लूकसाठी 'या' सोप्या पद्धतीने नेसा नऊवारी

Green Tea Benefits : वजन कमी करण्यापासून ते आजारांशी दोन हात करेपर्यंत...; 'हे' 2 पदार्थ मिसळून ग्रीन टी पिण्याचे ६ जबरदस्त फायदे

Male Birth Control Pill: आता पुरूषांसाठी देखील गर्भनिरोधक गोळी, कशी करते काम? वाचा सविस्तर...

Chemical Free Facewash For Pimple And Dark Spots: पिंपल्स आणि काळ्या डागांवर सोपा घरगुती उपाय, घरच्या घरी बनवा केमिकल फ्रि फेसवॉश!

SCROLL FOR NEXT