Spills Petrol Viral Video: रील व्हिडीओचा नाद लय वाईट; पेट्रोल पंपावर आजोबांचं संतापजनक कृत्य, पाहा VIDEO

Viral Video: एक वृद्ध आजोबा कारची टाकी ओव्हरफ्लो झालेली असताना देखील त्यात पेट्रोल टाकत आहेत.
Spills Petrol Viral Video
Spills Petrol Viral VideoSaam TV
Published On

Spills Petrol For Reel Video: देशात कच्च्या तेलाच्या किंमती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर देखील सातत्याने वाढत आहेत. अशात सोशल मीडियावर एक संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. एक वृद्ध आजोबा आपल्या चारचाकीची टाकी ओव्हरफ्लो झालेली असताना देखील त्यात पेट्रोल टाकत आहेत. (Latest Viral Video News)

रील व्हिडीओसाठी महागडं पेट्रोल वाया

या वृद्ध व्यक्तीला रील व्हिडीओ बनवायचा असतो. त्यामुळे तो स्वत: पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत आहे. कारची टाकी पूर्ण भरल्यानंतर देखील हा व्यक्ती पेट्रोल भरणे थांबवत नाही. त्यामुळे बरंच पेट्रोल खाली वाया जातं. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

Spills Petrol Viral Video
Viral Video News: बिचारा रे! मित्रांचं ऐकून प्रपोज केलं अन् फजिती झाली ... भररस्त्यात तरुणीनं चपलेनं झोडपलं; व्हिडिओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथे अशीच घटना घडली होती. याचा व्हिडीओ देखील व्हायरल होता. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपली कार पेट्रोलने धुवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या व्यक्तीला पोलिसांनी अटक देखील केली.

आता देखील नोएडामधून असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे देखील नागरिक संताप व्यक्त करत असून संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली जात आहे. पेट्रोल पंपावर अशाप्रकारचं कृत्य जिवघेणं देखील ठरू शकतं असं काही नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.

Spills Petrol Viral Video
Lappu Sa Sachin Song Viral: "लप्पू सा सचिन है, झींगुर सा..."; सीमा हैदरच्या लवस्टोरीवर भन्नाट गाणं, VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com