Shruti Vilas Kadam
नऊवारी साडी नेसण्यापूर्वी आधी ब्लाउज आणि शॉर्ट्स घाला. साडी नेसताना ती व्यवस्थित बसण्यासाठी कमरेला घट्ट आधार असणं गरजेचं आहे.
सर्वप्रथम साडीचं एक टोक घ्या आणि ते कमरेच्या उजव्या बाजूला खोचा. त्यानंतर साडी कमरेभोवती एक फेरी मारून पुन्हा पुढे आणा.
आता साडी कमरेभोवती व्यवस्थित गुंडाळा. साडीचा खालचा भाग जमिनीवर घासला जाणार नाही, याची काळजी घ्या.
साडीचा उरलेला भाग हातात घेऊन पुढच्या बाजूला एकसारख्या निऱ्या काढा. या निऱ्या कमरेच्या मध्यभागी व्यवस्थित खोचा.
आता साडीचा उरलेला भाग दोन्ही पायांच्या मधून मागच्या बाजूला न्या. तो कमरेच्या मागील बाजूला व्यवस्थित खोचा. यामुळे नऊवारी साडीला पारंपरिक धोतरासारखा लूक मिळतो.
आता साडीचा उरलेला भाग खांद्यावरून घ्या. पदराच्या छान निऱ्या काढून त्या पिनच्या मदतीने ब्लाउजला लावा. यामुळे पदर व्यवस्थित राहतो.
शेवटी साडीच्या निऱ्या आणि पदर व्यवस्थित करा. गरजेनुसार सेफ्टी पिन लावा. नऊवारी साडीसोबत नथ, ठुशी, हिरव्या बांगड्या आणि गजरा घाला. यामुळे तुमचा पारंपरिक मराठमोळा लूक पूर्ण होईल.