Dog In Train Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Dog In Mumbai Local : बाईsss.. जिथे बायकांना उभं राहायला जागा नाही, त्या लेडीज डब्ब्यातून कुत्र्याचा प्रवास; VIDEO VIRAL

Dog Travel By Train Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक महिला ट्रेनमधून चक्क कुत्र्याला घेऊन प्रवास करताना दिसत आहे.

Siddhi Hande

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील अनेक व्हिडिओ हे रेल्वेतील, मेट्रोमधील असतात. रेल्वेतील बायकांची भांडणे ही काही नवीन नाहीत. परंतु रेल्वेत अनेकदा माणुसकीचे दर्शन होते किंवा प्रेम पाहायला मिळते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक महिला चक्क बॅगेत तिच्या पाळीव कुत्र्याला घेऊन प्रवास करताना दिसत आहे.

प्रवाशांनी गच्च भरलेल्या ट्रेनच्या डब्ब्यात एक महिला आपल्या कुत्र्याला घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. तिने आपल्या बॅगेत कुत्र्याला ठेवलेले दिसत आहे. हा कुत्रादेखील रेल्वेतील प्रवाशांकडे मोठ्या उत्सुकतेने बघत आहे. रेल्वेत जिथे प्रवाशांना उभं राहायला जागा मिळत नाही त्याच रेल्वेत एका कुत्र्याने सुखरुप प्रवास केला आहे.

व्हायरल व्हिडिओत (Viral Video Of Dog) एक महिला आपल्या बॅगेत असलेल्या कुत्र्याला घेऊन उभी असलेली दिसत आहे. तिच्या आजूबाजूला बायकांची प्रचंडी गर्दी दिसत आहे. या गर्दीत एक लहान मुलगी त्या कुत्र्याशी खेळताना दिसत आहे. त्याच्या अंगावरुन मायेने हात फिरवताना दिसत आहे. कत्रादेखील या लेडीज डब्ब्यात एकदम शांत उभा असलेला दिसत आहे.

सामान्यतः कुत्र्यांना जर जास्त गर्दीच्या ठिकाणी नेले तर ते भूंकतात. त्या गर्दीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु हा कुत्रा एकदम शांत दिसत आहे. हा कुत्रा खूप गोंडस आणि क्युट दिसत आहे. तो त्याच्या मालकाच्या कुशीत एकदम शांत बसलेला दिसत आहे. महिला डब्ब्यातील या कुत्र्‍याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Dog Travel by Local Train Video)

roshogollaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'जिथे बायका न भांडता राहू शकत नाही त्या डब्ब्यातून कुत्र्याने प्रवास केला'. 'व्वा किती छा'न अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

SCROLL FOR NEXT