Woman pilot husband thrashed by mob for torturing 10-year-old domestic Saam Tv
व्हायरल न्यूज

Delhi Crime Viral Video: अल्पवयीन मोलकरणीवर केला अत्याचार, महिला पायलट आणि तिच्या पतीला जमावाने दिला चोप, व्हिडीओ व्हायरल...

Delhi Crime News: अल्पवयीन मोलकरणीवर केला अत्याचार, महिला पायलट आणि तिच्या पतीला जमावाने दिला चोप, व्हिडीओ व्हायरल...

Satish Kengar

Delhi Crime Viral Video: दिल्लीत एक महिला पायलट आणि तिच्या पतीला लोकांनी बेदम मारहाण केल्याचा एका व्हिडीओ समोर आलं आहे. महिला पायलटचा पतीही एअरलाइन कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीतील द्वारका परिसरात जमावाने या जोडप्याला बेदम मारहाण केली. १० वर्षांच्या मुलीला मोलकरीण म्हणून कामावर ठेवत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप या दाम्पत्यावर आहे.

मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३, ३२४ आणि ३४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय बालकामगार कलमांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना सध्या पोलिसांनी अटक केली आहे.

महिला पायलट आणि तिच्या पतीला मारहाण केल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिला पायलटच्या घराबाहेर काही लोक जमलेली दिसत आहे. या जोडप्याने काही वेळ या जमावाशी वाद घातला आणि नंतर अचानक जमावाने महिला पायलटवर हल्ला केला. यादरम्यान महिलेचा नवराही पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न करतो. मात्र यानंतर जमाव दोघांनाही रस्त्यावर ओढतो आणि त्यानंतर त्यांना मारहाण करताना या व्हिडीओत दिसत आहे. (Latest marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे २ महिन्यांपूर्वी या जोडप्याने १० वर्षांच्या मुलीला घरातील कामासाठी कामावर ठेवले होते. बुधवारी या मुलीच्या एका नातेवाईकाने मुलीच्या हातावर जखमेच्या खुणा पाहिल्यानंतर पोलिसांना कळवले. हे आरोप ऐकून काही वेळातच स्थानिक लोक तेथे जमा झाले आणि त्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

मुलीच्या हातावर आणि डोळ्याजवळ जखमेच्या खुणा असल्याचे जमावाने सांगितले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी जोडप्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महाराष्ट्रात पैशांची ढगफुटी; निवडणुकीत शेकडो कोटीचा धुरळा

Assembly Election: बारामती नको,शिरुर हवं; स्वत:अजित पवारांनीच केला खुलासा

Maharashtra Election: महायुतीसाठी RSSचे स्पेशल 65; मविआची प्रत्येक चाल ठरवणार फोल?

Maharashtra Election : भाजपचा नारा, काँग्रेसचं उत्तर; बटेंगेचं फावणार की जुडेंगे जिंकणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Ajit Pawar : 'बारामतीतून उभं राहणार नव्हतो, तर....'; भरसभेत अजित पवारांचा मोठा खुलासा, VIDEO

SCROLL FOR NEXT