Mumbai Rain Update: पावसाने झोडपले! मुंबईतील अनेक भाग जलमय, कुलाब्यात अनेकांच्या घरात शिरलं पाणी

Mumbai Rain Update: मुसळधार पावसामुळे कुलाब्यातील अनेक जणांच्या घरात गटाराचे घाण पाणी शिरले आहे.
Mumbai Rain Update
Mumbai Rain UpdateSaam tv
Published On

संजय गडदे

Mumbai Rain Update: मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. दमदार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे कुलाब्यातील अनेक जणांच्या घरात गटाराचे घाण पाणी शिरले आहे. (Latest Marathi News)

मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. कुलाब्यातही पाणी साचण्याबरोबरच लोकांच्या घरात गटाराचे पाणी शिरले आहे. गटाराचे पाणी लोकांच्या घरात गेल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस पडताच कुलाब्यातील कप परेड येथे गुडघ्याएवढे पाणी साचतं. तसेच लोकांच्या घरातही पाणी शिरतं. या सांडपाण्यामुळे लोक हैराण झाले आहे.

Mumbai Rain Update
Raigad Rain Update: रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपलं, अनेक भागात पूरस्थिती; अजित पवारांकडून प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना

कुलाब्यातील शिवशक्ती नगरातही घरात पाणी शिरल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांच्या प्रभागातून महापालिकेने ड्रेनेज लाईनची कामे केली आहेत. पण यानंतरही पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पावसामुळे पश्चिम द्रूतगती महामार्गावर सांताक्रूझ ते वांद्रादरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे. तर अंधेरी सबवेमध्येही पाणी साचले आहे. त्यामुळे तेथील वाहतूक ठप्प झाली आहे. अंधेरी मार्केटमध्ये पाणी साचल्याने भूयारी मार्ग बंद आहे. मुंबईत दादर, महालक्ष्मी, वरळी, मरीन लाईन्स, चर्चगेट, पेरड रोड परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

मुसळधार पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील मध्य,हार्बर आणि पश्चिन मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळित झाली आहे.

Mumbai Rain Update
Mumbai Local News : लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच स्वतंत्र डबा, नेमका काय आहे रेल्वेचा प्लान?

मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या यंत्रणेत बिघाड, कल्याण-कसारा रेल्वे सेवा ठप्प

मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुसधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या यंत्रणात बिघाड झाला आहे. यामुळे कल्याण-कसारा रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com