Raigad Rain Update: रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपलं, अनेक भागात पूरस्थिती; अजित पवारांकडून प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना

Raigad Rain Update: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना दूरध्वनी करुन त्यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
Raigad Rain Update
Raigad Rain UpdateSaam tv
Published On

Raigad Rain Update: रायगड जिल्ह्यात सुरु असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना दूरध्वनी करुन त्यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. (Latest Marathi News)

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात निर्माण होणारी पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटना, त्यामुळे करावे लागणारे नागरिकांचे स्थलांतर लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची कार्यवाही तातडीने आणि शक्यतो दिवसाच पूर्ण करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.

Raigad Rain Update
Uddhav Thackeray meet Ajit Pawar : अजित पवारांचं कौतुक अन् शिंदे-फडणवीसांवर निशाणा, उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले...

कोकणासह राज्यातील अनेक भागात पुढील चार दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी करुन आपत्कालीन मदत यंत्रणा चोवीस तास सतर्क ठेवण्याचे निर्देश दिले.

नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क करावे. गतवर्षांचा अनुभव लक्षात घेता बचाव व मदतकार्य रात्रीच्या वेळी करण्यात अडचणी येतात. त्यामुळे पुरामुळे बाधित नागरिकांचे स्थलांतर तातडीने करावे, शक्यतो ही कार्यवाही दिवसा पूर्ण होईल, याची दक्षता घ्यावी.

आपत्तीग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करावा. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

Raigad Rain Update
Maharashtra Monsoon Session Updates: 'वंदे मातरम्'वरून विधानसभेत गदारोळ, अबु आझमींच्या आक्षेपावर देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट उत्तर

रायगडमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला

गेल्या 24 तासांपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रायगडमधील खालापूर तालुक्यात 24 तासात 213 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. तब्बल खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

नदी शेजारील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. खालापूर मधील आपटे गावात देखील पुराचे पाणी शिरले असून घरे पाण्याखाली गेले आहेत. तर नदीचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने रस्ता देखील बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेय. आपटे गावात आलेल्या पुरस्थितीचा आढावा घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com