Mumbai Local News : लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच स्वतंत्र डबा, नेमका काय आहे रेल्वेचा प्लान?

Mumbai Local News Latest Update : मुंबईच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांमधून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो ज्येष्ठ नागरिकांसाठी शुभवार्ता आहे.
separate compartment senior citizens Mumbai local trains
separate compartment senior citizens Mumbai local trains saam tv
Published On

Mumbai Local News Latest Update : मुंबईच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांमधून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो ज्येष्ठ नागरिकांसाठी शुभवार्ता आहे. ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास लवकरच सुखकर होणार आहे. प्रत्येक लोकलमध्ये ज्येष्ठांसाठी एक डबा आरक्षित ठेवला जाणार आहे. तशी रेल्वे प्रशासनाची योजना आहे. रेल्वे प्रशासनाकडून यासंदर्भात मुंबई हायकोर्टात माहिती दिली आहे.

मुंबईच्या लोकलगाड्यांमध्ये सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस तुफान गर्दी असते. या ट्रेनमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र, हा त्रास काही प्रमाणात कमी होणार आहे. लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Railway) ज्येष्ठांना आरामात प्रवास करता येणार आहे. रेल्वेची तशी योजना आहे. स्वतः प्रशासनानं याबाबत माहिती दिली आहे. लोकल ट्रेनमधील लगेजच्या डब्याचे रुपांतर करून तो ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित केला जाणार आहे. यासंदर्भात २०२२ मध्ये मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावर उत्तर देताना रेल्वेने ही माहिती दिली. (Latest News in Marathi)

separate compartment senior citizens Mumbai local trains
Kalyan-Dombivli Rain News : पावसानं उडवली दैना... डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात पाणीच पाणी, कल्याण- नगर महामार्गावरील वाहतूक बंद (पाहा व्हिडिओ)

जनहित याचिकेत काय म्हटलं आहे?

मुंबई हायकोर्टात ६६ वर्षीय के. पी. पुरुषोत्तम नायर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. जनहित याचिकेनुसार, मुंबईच्या उपनगरीय लोकलगाड्यांमधून दररोज साधारण ५० हजार ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. लोकल ट्रेनमध्ये एका डब्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior citizen) द्वितीय श्रेणीच्या डब्यात अवघ्या १४ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. मात्र, गर्दीच्या वेळेस त्या आसनांचा ताबाही तरूण मंडळी घेते. अशात ज्येष्ठ नागरिकांना बसायला जागा मिळत नाही.

रेल्वेची काय आहे योजना?

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई हायकोर्टात रेल्वेने नुकतेच प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. लोकल ट्रेनमधील लगेज डब्यात बदल करून तो ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित करण्याची योजना आहे, असे त्यात म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी यासंदर्भात रेल्वेने एक सर्व्हे केला. लगेजच्या डब्यात जवळपास ९० टक्के प्रवासी हे जनरल प्रवासी असतात. तर वस्तू किंवा इतर मालवाहतूक करणारे फक्त १० टक्केच प्रवासी असतात, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे चारपैकी एक डबा ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित करण्याचा विचार आहे. त्याचा कसलाही त्रास मालवाहतुकीचं तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांवर होणार नाही, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

separate compartment senior citizens Mumbai local trains
Railway Track Crack: मानवत रोड ते सेलू दरम्यान रेल्वेरूळ तुटला; गँगमनच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली

अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ही आकडेवारी बघता जनरल डब्यात होणारी प्रचंड गर्दी बघता तो डबा ज्येष्ठांसाठी आरक्षित करण्यास वाव नाही. तथापि, मालवाहतुकीच्या डब्यात तुलनेत कमी गर्दी असते. त्यामुळे ज्येष्ठांसाठी एक लगेज डबा आरक्षित करणे चांगले राहील. मध्य रेल्वेवरील १२ डब्यांच्या लोकलमध्ये चार हे डबे प्रथम श्रेणीचे असतात, त्यात ८८ आसन क्षमता, तर तीन महिलांसाठीच्या डब्यात ३९ आसन क्षमता, तर दोन डबे हे अपंगांसाठी आरक्षित असतात. तर ३ जनरल डबे हे महिलांसाठी आरक्षित असतात. त्यांची आसनक्षमता २२१ आहे. तर इतर आठ जनरल डब्यांमध्ये ६२८ आसनक्षमता असते.

सन २०१४ मध्ये न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांच्या खंडपीठाने स्वतः दखल घेऊन जनहित याचिकेवर सुनावणी घेतली होती. ए. बी. ठक्कर यांनी लिहिलेले पत्र याचिकेत रुपांतरित केले होते. लोकल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा आरक्षित करण्याची तरतूद करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली होती. जानेवारी २०१५ मध्ये मुंबई हायकोर्टाने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला आदेश दिल्यानंतर प्रत्येक उपनगरीय लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी १४ जागा आरक्षित करण्यात याव्यात, असे आदेश दिले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com