Aditya Thackeray On Bmc Street Furniture Scam: मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत रस्त्यावर लावण्यात येणारे विविध शोभिवंत साहित्य म्हणजेच स्ट्रीट फर्निचरच्या खरेदीमध्ये २६३ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत चौकशी करण्याची घोषणा केली होती.
मात्र ही चौकशी लोकायुक्तांद्वारे केली जावी, अशी आदित्य ठाकरे यांची मागणी आहे. यासाठी त्यांनी आता राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिलं आहे.
पत्रात आदित्य ठाकरे यांनी काय लिहिलं?
राज्यपाल यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे यांनी मागणी केली आहे की, रस्त्यावरील फर्निचर घोटाळा रोखण्यासाठी आपण हस्तक्षेप करावा आणि याची निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी लोकायुक्तांमार्फत चौकशी करावी. अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
त्यांनी पत्रात लिहिलं आहे की, 10 मे 2023 रोजी आमच्या बैठकीनंतर आम्ही विविध व्यासपीठांवर हा मुद्दा मांडत राहिलो. बीएमसी राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या प्रतिनिधींना उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहे. शेवटी विशेषाधिकार प्रस्ताव पर्यायाचा शोध घेतल्यावर पालिका आयुक्तांनी डीएमसीला माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले. (Latest marathi News)
तत्पूर्वी एका ट्विटमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले होते की, ''स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची समितीमार्फत चौकशी करू असं त्यांनी (मुख्यमंत्री शिंदे) म्हटलंय. मुंबईकरांचा हा विजय आहेच, पण ही चौकशी मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर मित्रांच्या वरदहस्तानेच करून क्लिनचिट मिळवणारी असू नये. ते म्हणाले होते की, ''यासाठी मुंबईतल्या या घोटाळ्यांची लोकायुक्तांद्वारे चौकशी व्हावी, अशी आमची मागणी कायम आहे.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.