Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आयो! आजी-बाबानं घेतली नवकोरी गाडी, चावी मिळताच डान्स शोरुमध्ये थिरकलं ओल्ड कपल

Elderly Couple Viral Video: सोशल मीडियावर दररोज अतरंगी असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एका आजी-आजोबांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नवीन कार उत्साह पाहण्यासारखा आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वत:च घर आणि स्वत: एक गाडी असावी, असे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. अनेकजण कमी वयातच सर्व गोष्टी मिळवतात तर काहींना या वस्तू घेण्यासाठी वेळ लागतो. मात्र जेव्हा अथक प्रयत्नानंतर आवडीची वस्तू घेतो तेव्हा तो आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येतो. सध्या सोशल मीडियावर एका कपलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नवीन कारची डिलिव्हरी घेयला गेल्यानंतर आनंदाने डान्स केलेला आहे. सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस व्हिडिओ आलेला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक कार शॉरूम दिसत आहे. या शॉरुमध्ये एक वयोरुद्ध कपल (Couple)आहे जे त्यांच्या नवीन कारची किल्ली घेताना दिसता आहेत. शिवाय त्यांच्यासोबत तिथे शॉरुमधील अन्य कर्मचारीही आहेत.

कारची किल्ली आजीच्या हातात असते त्यावेळी ते आजोबा अत्यंत आनंदी होऊन एकटेच डान्स करत आहेत. मात्र काही वेळात आजीही आजोबांना साथ देत डान्स करण्यास सुरुवात करतात. वयोरुद्ध कपलचा डान्स (Dance) करण्याचा उत्साह आणि कार खरेदी करण्याचा आनंद पाहून तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ''@popupmediahouse'' या अकाउंटवर पोस्ट (Post) करण्यात आलेला आहे. व्हिडिओ मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओला एका दिवसांतच हजारो नेटकऱ्यांनी लाईक्स पसंती दिलेली आहे.

व्हिडिओ (Video) पाहिल्यानंतर भन्नाट प्रतिक्रिया कमेंटबॉक्समध्ये नेटकरी वर्गाने दिलेल्या आहेत. त्यातील पहिल्या यूजरने लिहिले आहे की,''मस्तच आयुष्य'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''यांचा आनंद पाहून दिवस मस्त झाला'' तर अन्य नेटकऱ्यांनी कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बीडच्या मयत ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबीयांना मिळाला न्याय

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

Crime: कोचकडून हॉकी खेळाडूवर बलात्कार, स्टेडिअमच्या बाथरूमध्ये नेलं अन्...; पीडित मुलगी गरोदर

SCROLL FOR NEXT