Crocodile Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Crocodile Viral Video: अबब! चक्क बाईकवरून मगरीचा प्रवास, Video होतोय व्हायरल

crocodile rides bike on uttar pradesh: उत्तर प्रदेशमधील पूरपरिस्थितीत मगर नागरिक वस्ती आली. काही तरुणांनी तिचा बचाव करून तिला बाईकवर बसवून नदीत सोडले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Manasvi Choudhary

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चक्क मगर बाईकवर बसलेली दिसत आहे. मगरचा बाईकवरचा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

व्हायरल व्हिडीओ हा उत्तर प्रदेशमधील आहे. मागील अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये पावसाने कहर केला आहे. पावसामुळे उत्तरप्रदेशमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. नद्या, नाले ओसंडून वाहू लागले होते. यामुळेच पुराच्या पाण्यातून अनेक जलचर प्राणीही घराच्यांत घुसले.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मगर पुराच्या पाण्यातून वाहून नागरिक वस्तीत आली आहे. मगरीला पाहून भल्याभल्यांचा थरकाप उडतो मात्र येथील नागरिकांची परिस्थिती काहीशी वेगळी आहे. मगरीला पाहून कोणी घाबरले नाही. तर तेथील काही तरूणांनी मगरीला पकडले. मगरीला घेऊन त्यांनी बाईकने प्रवास केला आहे. मगरीला पकडून त्याने तिचे तोंड बांधले आणि तिला दुचाकीवर बसवले आहे. ते मगरीला सोडण्यासाठी नदीत घेऊन गेले. व्हिडीओतील या मुलांच्या चेहऱ्यावर कोणतीही भिती दिसत नाही ते जणू हे खेळणं असल्याचं समजत आहेत.

मगरीला पकडल्यानंतर, तरूणांनी तिचे तोंड बांधले आणि नंतर मगरीला दुचाकीवर बसवले. दरम्यान येथे नागरिकांची मोठी गर्दी दिसत आहे. दरम्यान एक तरूण दुचाकी चालवताना दिसत आहे तर दोघेजण मगरीला मध्यभागी बसवून नदीकडे घेऊन जात आहेत.

सोशल मीडियावर मगरीचा बाईक चालवताना व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. जो पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. तर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील केल्या आहेत. हा व्हिडिओ @gharkekalesh ने त्याच्या अकाउंटवर शेअर केला आहे, जो आतापर्यंत १४८.६ हजार लोकांनी पाहिला आहे. एका युजरने व्हिडिओवर लिहिले आहे की, "मगर घरी जाईल आणि त्याच्या मित्रांना सांगेल, कारण तिने आज बाईक चालवली. आणखी एका युजरने, "गावातील मुलांसाठी ही चांगली गोष्ट आहे की त्यांनी मगरीला इजा करण्याऐवजी नदीत सोडण्याचा निर्णय घेतला."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाने कहर; दादर स्थानक पाण्याखाली, नागरिकांची तारांबळ|VIDEO

Maharashtra Live News Update: रायगडात पावसाचा ऑरेंज अलर्ट

Mumbai Rain : साखरझोपेत असताना घरावर दरड कोसळली, बापलेकीचा मृत्यू, आई-मुलगा गंभीर जखमी|VIDEO

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकलला लेट मार्क, प्रवाशांचा खोळंबा, पाहा व्हिडिओ

IAS Success Story: CA झाली, नंतर UPSC परीक्षेत मिळवली दुसरी रँक; वडिलांचे स्वप्न केले पूर्ण; IAS हर्षिता गोयल यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT